भंडारा : आमदार राजू कारमोरे (MLA Raju Karmore) यांना 50 लाखांच्या लुटीची तक्रार जिव्हारी लागण्याची शक्यता असून त्यांना या रकमेचा हिशोब द्यावा लागणार आहे. भंडारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरु असताना इतक्या मोठ्या रकमेची वाहतूक कशी काय केली, याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे मित्र प्रेमापोटी मोहाडी पोलिस ठाण्यात घातलेला गोंधळही त्यांना भोवण्याची शक्यता आहे. या निमित्ताने पोलिस विरुद्ध आमदार असा सामना रंगू शकतो.
राष्ट्रवादीचे आमदार कारेमोरेे यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे दोन व्यापारी मित्र हे काल रात्री 9 च्या वाजे दरम्यान घरून 50 लक्ष रुपयांची रोकड आर्टीकातून तुमसरकडे घेऊन जात होते. गाडी वळवताना इंडेकेटर का दाखवलना नाही म्हणून मोहाडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना पाठलाग करून अडवले. हा वाद वाढत गेला आणि गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाहीतर 50 लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे. दबंगगिरी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी आता स्वतः गृह मंत्र्याकडे करणार असल्याचे सांगितले.
पोलिसांनीच चोरी केल्याचा आरोप आमदाराने केल्याने हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर गंभीरतेने घेतले गेले आहे. तसेच पोलिसांनीही सरकारी कामकाजात अडथळ्याचा गुन्हा छवारे आणि पटले यांच्यावर दाखल केला आहे. आमदारांच्या दाव्यानुसार या दोघांकडे आपण 50 लाख रुपये दिले होते. त्यांच्या या दाव्यामुळे त्यांचीच अडचण होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आचारसंहिता सुरु आहे. या काळात कोणत्याही मोठ्या रकमेची वाहतूक करताना भंडारा जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. नियुक्त केलेल्या फ्लाइंग स्काॅडला तशी माहिती द्यावी लागते. मात्र आमदार व त्यांच्या जिवलग मित्रांनी अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ठ झाले आहे. इतकी मोठी रक्कम वाहतूक करत असताना लूटमार होण्याचा धोका असू शकतो. मग त्याची पूर्वकल्पना पोलिसांना का दिली नाही, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे एक लाख रुपयांवरील रक्कमेचे व्यवहार करतांना चेक अथवा शासकीय नियमात असलेल्या सुविधेनुसार NEFT किंवा RTGS ने रक्कम देता येणे शक्य होते. एवढ्या मोठ्या रकमेच्या रोख व्यवहाराची माहिती पोलिसांना आता प्राप्तिकर विभागाला दिली आहे.
या साऱ्या परिस्थितीत आमदार कारमोरे व त्यांचे जिवलग मित्र यासीन छव्वारे व अविनाश पटले यांना विविध यंत्रणांना त्याची उत्तरे द्यावी लागणार आहेत. दुसरीकडे आपल्या मित्रांच्या बचावासाठी आमदारांनी मोहाडी पोलिसांना अश्लील शिविगाळ त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्याचाही व्हीडीओ व्हायरल झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.