मी दिलेले 50 लाख रुपये पोलिसांनी लुटल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या आमदाराचा ठाण्यात धिंगाणा!

भंडारा जिल्ह्यातील आमदार राजू कारेमोर (Raju Karemore) सध्या आलेत चर्चेत
MLA Raju Karemore

MLA Raju Karemore

Sarkarnama 

भंडारा : व्यापारी मित्राला पोलिसांनी बेदम मारहाण केली म्हणून आमदार राजू कारेमोरेनी (MLA Raju Karemore) पोलिस ठाण्यात धिंगाणा घालतल्याचा प्रकार भंडारा (Bhandara) जिल्ह्यात घडला. आमदार एवढ्यावरच थांबले नाही तर पोलिसांनी 50 लक्ष रुपयाची रोख रक्कम पळविल्याची आमदार मित्रांनी तक्रार केली आहे. तर पोलिसांनी देखील आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणत असल्याची तक्रार दाखल केली आहे.

मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत धिंगाणा घातल्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

<div class="paragraphs"><p>MLA Raju Karemore</p></div>
PSI साठी 70 हजारांची लाच घेणारा पंटर 'एसीबी'च्या जाळ्यात

कारेमोरेे यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे दोन व्यापारी मित्र हे काल रात्री 9 च्या वाजे दरम्यान घरून 50 लक्ष रुपयांची रोकड आर्टीकातून तुमसरकडे घेऊन जात होते. गाडी वळवताना इंडेकेटर का दाखवलना नाही म्हणून मोहाडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना पाठलाग करून अडवले. हा वाद वाढत गेला आणि गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाहीतर 50 लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे. दबंगगिरी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी आता स्वतः गृह मंत्र्याकडे करणार असल्याचे सांगितले.

<div class="paragraphs"><p>MLA Raju Karemore</p></div>
वळसे पाटील, महेश लांडगे यांचेही फोटो वापरले..तरी आढळरावांच्या मनासारखे झाले नाही...

दुसरीकडे बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिस उपनिरीक्षक राणे यांनी देखील छावारे आणि पटले यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा करीत असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरु केला आहे.

या साऱ्या प्रकारात आमदार कारेमोरे यांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचाही व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ते पोलिसांना दमदाटी करीत असल्याचा यात दिसत आहे. पोलिसांनीही दोन व्यापाऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन काय कारवाई होणार, याकडे लक्ष आहे.

पोलिस उपनिरीक्षकासह चार जण निलंबित

दरम्यान भंडारा जिल्ह्यातीलच जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचे वाहन थांबून त्यातील रक्कम पळविण्याचा प्रकार पोलिसांनी केला होता. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी पोलिस उपनिरीक्षकासह चौघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात पोलिस उपनिरीक्षक बंडू थेरे, पोलिस शिपाई रमेश वाघाडे, प्रमोद आरिकर, पोलिस नायक कार्तिक कांबळे यांचा समावेश असून ते चारही कर्मचारी कारधा पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com