Ravi Rana Sarkarnama
विदर्भ

Video Ravi Rana : आमदार रवी राणांचं ठरलं! 'या' चिन्हावर निवडणूक लढवणार

Jagdish Patil

Ravi Rana Election symbol : आमदार रवी राणा (Ravi Rana) हे आगामी विधानसभा निवडणूक पाना या चिन्हावर लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाने पाना हे निवडणूक चिन्ह दिलं आहे.

त्यामुळे यापुढे राणा हे याच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं फिक्स झालं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी देखील पाना चिन्हावरच निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या.

दरम्यान, राणा दाम्पत्याचे कट्टर विरोधक असलेल्या प्रहार पक्षाच्या बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना निवडणूक आयोगाने बॅट चिन्ह दिलं आहे. रवी राणा हे अमरावतीच्या बडनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. तर आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद सर्वांना सर्वश्रूत आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचं बघायला मिळालं आहे. त्यामुळे लोकसभेला कडू यांनी नवनीत राणांना (Navneet Rana) पराभूत करण्यासाठी डावपेच आखले होते. तसंच ते आता रवी राणांच्या विरोधात रणनीती आखण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे आता राणांचा पाना कडूंच्या डावपेचांविरोधात आपला करिष्मा दाखवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT