Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवारांनी दिला भडका उडवून; अजित पवारांचं राजकीय भविष्य सांगून टाकलं!

Vijay Wadettiwar criticism of the Mahayuti government : काँग्रेस पक्षाचे नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती भाजप सरकारवर टीका केली.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती भाजप सरकारची विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना काय परिस्थिती राहील, यावर भाष्य करत डिवचलं.

"भाजपकडे चेहराच नाही. एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढं करावा लागतोय. अजित पवार यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह सांगतिल, तसं जगावं लागेल", असं विधान विजय वडेट्टीवार यांनी करत एकाचवेळी तिघांना डिवचलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना, महायुती भाजप सरकारवर टीका केली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला. "या तिघांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. महाविकास आघाडीकडे भाजपनेहमी बोट दाखवते. परंतु भाजपला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशिवाय पर्याय नाही. कारण निडणुकीला समोरे जाताना भाजपकडे चेहराच नाही", असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

Vijay Wadettiwar
Ajit Pawar - Devendra Fadnavis Criticize Each Other : कामांना स्थगिती देण्यावरून अजित पवार- फडणवीस आमने-सामने

'विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपकडे चेहरा नाही. मत मिळवण्यासाठी भाजपकडे चेहराच नाही. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने (RSS) प्रयत्न करू देत, नाहीतर कोणी करू देत, पण भाजपला मत मिळणार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या नावावर जे काही होईल, तेच भाजपचे होईल', असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

Vijay Wadettiwar
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड आणि भाजपमध्ये संघर्ष पेटणार; छत्रपती संभाजीनगरमध्ये पडली ठिणगी

'अजित पवार यांची अवस्था महायुतीत एकाकी झाली आहे. त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशिवाय पर्याय नाही. या दोघांनी त्यांना दुसऱ्यासोबत जा म्हंटल, तरी ते त्यांनी स्वीकारावे लागेल. अशा परिस्थिती अजित पवार काय करत आहेत, ते पाहावं लागले. कारण त्यांच्याकडे कोणताच उपाय नाही', असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

मोदींनी 2026 मध्ये निवडणुकांना समोरे जावा लागणार

'मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत सत्ताधारी तिघा मित्र पक्षांमध्ये भडका उडातो आहे. सत्तेसाठी हे तिघे काही दिवसांनी एकमेकांचे कपडे फाडतील. एकमेकांना ठोकतील, श्रेय वादाचा हा सूर विकोपाला जाईल, असे भाकीत देखील विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. केंद्रातील सरकार 2025 हे वर्ष काढू शकणार नाही, 2026 ला निवडणुकांना समोरे जाण्याची वेळ मोदींवर येईल', असेही भाकीत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

भाजपने राजकारणासाठी सर्वसामान्यांचे जीवन उद्धवस्त केले

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत. बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं. आर्थिक गुन्हेगारीत महाराष्ट्र पुढे जात आहे. ड्रग्ज विक्री, हप्तेखोरी वाढलीय. भाजपने राजकारणासाठी सर्वसामान्यांचे जीवन उद्धवस्त केले आहे. योजनांच्या नावाखाली राज्याती तिजोरी रिकामी करण्यात हे महायुती भाजप सरकार धन्यता मानत आहे, असा आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com