Sharad Pawar, PM Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

भाजप व राष्ट्रवादीची युती होणार : आमदाराच्या भविष्यवाणीमुळे खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली.

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या भेटीवर युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी प्रतिक्रिया देत राज्यात भाजप (BJP)-राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) युती झाल्यास आचर्य वाटू, नये असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने राज्यात खळबळ उडाली आहे.

शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार पुढील कार्यकाल पूर्ण करणार असल्याचे सांगितले असले तरी राजकारणात काहीही होऊ शकते, असेही राणांनी म्हटले आहे.

आमदार राण अमरावतीमध्ये बोलत होते. यावेळी राणा म्हणाले, शरद पवार वेगळ्या दिशेने बोलतात व करतात वेगळे त्यामुळे काहीही होऊ शकते, असेही ते म्हणाले. त्याच बरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबई आणि अलिबागमधील संपत्ती ईडीने जप्त केली. यावर राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामुळे मातोश्री अडचणीत येऊ शकते, असे खळबळजनक विधान राणा यांनी केले.

मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सरकार मधील सर्व पैसे हे मातोश्रीवर पोहचवले जातात. हे पैसे अनिल परब व संजय राऊत यांच्या मार्फत जातात. त्यामुळे मातोश्री अडचणीत येऊ शकते, असेही राणा म्हणाले.

पंतप्रधान मोदी आणि पवारांच्या भेटीवरून राज्याच्या राजकारणात तर्कवितर्क लढवले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वीच बारा आमदारांबाबतच पवार मोदींना भेटले असावेत, असं माध्यमांना सांगितलं होतं. अखेर शरद पवारांनीच पत्रकार परिषदेत त्यावर शिक्कामोर्तब केले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या बाबतीत चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

राज्यपालांची तक्रार केली असून त्याबाबत पंतप्रधान मोदी विचार करुन योग्य तो निर्णय घेतील, असेही पवार म्हणाले. या सोबतच शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधातील कारवाईबाबत चर्चा झाली असून ही कारवाई कशासाठी याबाबतही आपल्यामध्ये चर्चा झाली असल्याचे पवार यांनी सांगितले. या व्यतिरीक्त महाराष्ट्रातील केंद्रीय तपाय यंत्रणांच्या कारवाया, नवाब मलिक यांच्याविरोधातील कारवाई किंवा अन्य कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT