यांची नाराजी पुढच्या जन्मातही मिटली नाही, तरी काही बिघडत नाही…

या राज्यामधील अनेक मंत्री असे आहेत की ज्यांना वाटतं ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहेत, त्या वेगाने खाता येत नाहीत, असे आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) म्हणाले.
MLA Sudhir Mungantiwar
MLA Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपली दुःख, वेदना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये खासदार आढळराव, खासदार गीते, बंडू जाधव, आमदार तानाजी सावंत ही नावे सांगता येतील. यांच्या नाराजीची कुणालाही चिंता नाही, हे त्यांचे दुःख आहे. महाविकास आघाडीतील लोकांची नाराजी या जन्मात काय पुढच्या जन्मातही दूर झाली नाही, तरी काही बिघडत नाही. पण चांद्यापासून बांद्यापर्यंत जनता नाराज आहे, त्यांची नाराजी मिटली पाहिजे, असे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) एक तरी व्यक्ती समाधानी आहे का, असा प्रश्‍न करीत आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) म्हणाले, मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) वाटतं की गृहमंत्री सुडाच्या भावनेने वागत नाही, गृहमंत्री (Home Minister) कारवाई करत नाही, अटक करत नाही. या राज्यामधील अनेक मंत्री असे आहेत की ज्यांना वाटतं ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहेत, त्या वेगाने खाता येत नाहीत. आमच्या नस्त्या अटकतात, अधिकारी आमची कामे थांबवितात. चार मंत्री मुख्य सचिवाच्या विरोधात तक्रार करायला गेले होते. पण त्याचेही पुढे काही झाले नाही.

त्यांनीही कष्टाने कमावले होते..

लोकांनी सर्व काही कष्टानं कमावलेलं आहे आणि आता लोकांच्या कमाईवर ईडीकरवी धाडी घालण्यात येत आहेत, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हेच वाक्य अभिनेत्री कंगणा राणावतने तिच्या घरावर बुल्डोजर चालवले होते, तेव्हा म्हटले होते की, मी हे घर, ऑफीस कष्टाने कमावले आहे. तेव्हा तिच्या वेदना कुणाला कळल्या नाही का? उशिरा का होईना संजय राऊत आणि कंगणाच्या विचारांत समानता आली, हे मोठे यश आहे.

MLA Sudhir Mungantiwar
मुनगंटीवार म्हणाले, सत्ता मे जो आये है, जरा याद करो इनकी बेईमानी…

त्यांच्यावर वेळ आली की, असत्यमेव जयते..

लोकशाहीमध्ये आणि संविधानाच्या चौकटीत भाषणस्वातंत्र्य आणि लिखाणस्वातंत्र्य आहे. काही लोकांचा असा स्वभाव झाला आहे की, जेव्हा स्वतःची चूक होते, तेव्हा ते स्वतःच्या त्या चुकीच्या समर्थनार्थ न्यायाधीश होतात आणि दुसऱ्याची चूक होते, तेव्हा ते त्याच्या विरुद्धचे न्यायाधीश होतात. हा दुटप्पीपणा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीआरपीसी १६० ची नोटीस जाते. १३० कोटीच्या भारत देशामध्ये ३० कॅबिनेट मंत्री आहेत. नारायण राणेंना ५०५ (२) ची नोटीस जाते. त्या संदर्भात स्व. बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळांनी ५०५ (२) ची नोटीस दिली. तेव्हा बाळासाहेब असे म्हणाले होते, मी वचन देतो की, हा माणूस यापुढे कधी मंत्री होणार नाही. प्रवीण दरेकरांना नोटीस देतात, तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली की असत्यमेव जयते, असं त्यांचं आहे, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com