MLA Vinod Agrawal. Sarkarnama
विदर्भ

MLA Vinod Agrawal : कोणत्या कारणामुळे अपक्ष आमदाराला योग्य वाटली इंग्रजांची सत्ता

अभिजीत घोरमारे

MLA Vinod Agrawal : गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांना स्वतंत्र भारतातही इंग्रजांची एक गोष्ट अधिक आवडत आहे. ब्रिटीश शासनाची ही पद्धत भारतीय पद्धतीपेक्षा किती सरस आहे, याचे उदाहरण त्यांनी दिले आहे. भूमी अभिलेख विभागाचा हा विषय आहे. सध्याच्या सरकारी यंत्रणेकडून तयार होत असलेल्या दस्ताऐवजांपेक्षा ब्रिटीश काळातील दस्तऐवज चांगले अशी खंत आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त करीत भूमी अभिलेख विभागाचे वाभाडेच काढले आहेत. गोंदिया पंचायत समितीच्या बैठकीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

आमदार विनोद अग्रवाल यांची कार्यप्रणाली नेहमीच चर्चेत असते. यापूर्वी देखील त्यांनी अनेकदा सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेवून यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. त्यातच नुकतीच आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून गोंदियात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत गोंदिया तालुक्याचे सरपंच व यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गंगाझरीचे सरपंच सोनु घरडे यांनी गायरान जागेचे प्रश्न उपस्थित केला. भूमी अभिलेखात या जमिनीचा स्पष्ट उल्लेख नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भूमी अभिलेख विभागाकडून याप्रकाराची सुधारणा करण्यात यावी, असे मत त्यांनी मांडले. आमदार अग्रवाल यांनी भूमी अभिलेख विभागाकडून अनेकदा सुधारणा करण्यात आली, मात्र पुढे तेच ते दस्ताऐवज बघायला मिळत आहेत. भूमी अभिलेख विभागापेक्षा आजच्या कार्यशैलीपेक्षा ब्रिटिश काळातील दस्तऐवज चांगले होते, अशी खंत व्यक्त करीत आमदारांनी यंत्रणेचे वाभाडे काढले. गोंदियाच्या आढावा बैठकीतील आमदार विनोद अग्रवाल यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचेही पितळ उघडे पडले आहे.

गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी पंचायत समितीच्या बैठकीत व्यक्त केलेली खंत काही अंशी खरीही आहे. भूमी अभिलेख कार्यालय केवळ शोभेची वास्तू ठरत आहे. अनेक अभिलेख गहाळ झाले आहेत. जे अभिलेख प्राप्त होतात त्याच्यातही अनेक चुका आढळतात. त्यामुळे सरकारचा हा विभागकेवळ घोळ करण्यासाठीच बनवला गेला काय? असा प्रश्न सर्वसामान्य पडला आहे. त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल यांनी यंत्रणेची घेतलेली आढावा बैठकीत अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी गायरान जागेची नोंद भूमी अभिलेखामध्ये नाही. त्यामुळे अनेक बाबींमध्ये अडचण निर्माण होत असल्याची बाब आमदारांसमोर आली. अशा घोळाबाबत कितीही सूचना दिल्या तरी ‘पळसाला पाने तीनच’ अशीच भूमी अभिलेख विभागाची कार्यप्रणाली दिसत आहे. याबाबत यंत्रणेकडून सुधारणा करण्यासाठी सूचना देऊन आमदारांनी यंत्रणेला सुधारण्याची एक आणखी संधी दिली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT