Shoot Out At Gondia : माजी नगरसेवक कल्लूच्या हल्ल्यातील दहावा आरोपी अद्यापही फरारच !

Gondia Police : गोंदिया पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात असून, त्यांचे टेंशन अधिक वाढलेले आहे.
Gondia Kallu Yadav
Gondia Kallu YadavSarkarnama
Published on
Updated on

Shoot Out At Gondia : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या कटात मुख्य आरोपी असलेला प्रशांत उत्तम मेश्राम (38, रा. भीमनगर) फरार असून, तो काहीही केल्या पोलिसांच्या हातात लागत नाही. शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा त्याच्या शोधात आहेत.

या फरार आरोपीमुळे गोंदिया पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गोंदिया पोलिसांचे टेंशन अधिक वाढलेले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या दहाव्या फरार आरोपीला अटक करण्याचे शिवधनुष्य गोंदिया पोलिसांना पेलावे लागणार आहे. माजी नगरसेवक कल्लू यादववर आर्थिक देवाण-घेवाणीतून गोळी झाडून खुनाचा प्रयत्न करण्याच्या कटात 10 आरोपींची नावे पुढे आली होती. या कटात प्रशांत मेश्राम हा मुख्य आरोपी असून, घटनेपासून फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत, पण अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gondia Kallu Yadav
Gondia NCP News : पुत्राच्या घरवापसीने आमदार पित्याचे हात झाले मजबूत !

या प्रकरणात 12 जानेवारी रोजी आरोपी गणेश शिवकुमार शर्मा (21, रा. भिंडी ले आऊट वरोडा ता. कळमेश्वर जि. नागपूर), अक्षय मधुकर मानकर (28, रा. सम्राट ग्राउंड शिक्षक कॉलनी रिंकू राऊत (32,रा. कुंभारेनगर, गोंदिया) व नागसेन बोधी मंतो (41, रा. गौतम बुद्ध वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया) यांना तर 13 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता आरोपी शुभम विजय हुमने (27, रा. भीमनगर, गोंदिया) व सुमीत ऊर्फ पंछी विकास डोंगरे (23, रा. कुंभारेनगर, गोंदिया) या दोघांना तसेच 14 जानेवारी रोजी रोहित प्रेमलाल मेश्राम (32, रा. कुंभारेनगर, गोंदिया) आणि 15 जानेवारी रोजी नितेश ऊर्फ मोनू लखनलाल कोडापे (28, रा. विहीरगाव, तिरोडा- ह.मु. कुंभारेनगर, गोंदिया) व मयूर ऊर्फ सानू विजय रंगारी (27, रा. सिंगलटोली, आंबेडकर वॉर्ड, गोंदिया) यांना अटक करण्यात आली होती.

सर्व आरोपींना 22 जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर 23 जानेवारी रोजी त्यांची भंडारा येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. मुख्य फरार आरोपीचा शोध सहायक पोलिस निरीक्षक विजय गराड, शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा पथक घेत आहे. येणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेता, विरोधक माजी नगरसेवकावर झालेल्या हल्ला प्रकरणाचा मुद्दा प्रचारात वापरू शकतात. ही बाब सत्ता पक्षांच्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे कधी एकदा या दहाव्या आरोपीला अटक करून या प्रकरणातून आपली सुटका करून घेतोय, असे गोंदिया पोलिसांना झालेले आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर दहाव्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Edited By : Atul Mehere

R

Gondia Kallu Yadav
Gondia Bridge Controversy : दोन आमदारांनी केले भूमिपूजन, तरी गावकऱ्यांवर आली अर्ध जलसमाधी घेण्याची वेळ !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com