NCP Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Nagpur MLC Election: मोठी बातमी: नागपूर पदवीधरच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; शरद पवारांचा लाडका नेता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

Mahavikas Aaghadi News : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपावर एकमत न झाल्यानं आणि काँग्रेस पक्षानं परस्पर तीन उमेदवारांची नावे जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.त्यातच आता नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठं धक्कादायक ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Deepak Kulkarni

Vidarbha News: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपावर एकमत न झाल्यानं आणि काँग्रेस पक्षानं परस्पर तीन उमेदवारांची नावे जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.त्यातच आता नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठं धक्कादायक ट्विस्ट निर्माण झाला आहे.

काँग्रेसने नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांना पुन्हा मैदानात उतरवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शुक्रवारी रात्री याबाबतची काँग्रेसकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्याचवेळी भाजपमध्ये मात्र उमेदवाराच्या नावावर अद्याप सस्पेन्स कायम आहे.भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे, अनिल सोले आणि मतदार नोंदणी उपप्रमुख सुधीर दिवे या तीन नावांची चर्चा नागपूर पदवीधरसाठी चर्चा आहे.

याचदरम्यान, नागपूर पदवीधरच्या निवडणुकीत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे गुरुजी यांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. कराळे गुरुजी यांनी नागपूर पदवीधरसाठी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

नितेश कराळे गुरुजी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील एक आक्रमक चेहरा मानले जातात. तसेच त्यांची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ राहिली आहे.ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध कार्यक्रमांमधून सत्ताधारी पक्षांवर टीकेचे आसूड ओढताना दिसून येतात. आता हेत कराळे गुरूजी पदवीधरच्या निवडणुकीत स्वत:चे नशीब आजमावण्याच्या विचारात आहे.

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी काहीही झालं तरी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणारच, अशी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचंच चित्र आहे. काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नाराज आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाबाबत महत्त्वाची राजकीय अपडेट समोर आली आहे. या मतदारसंघातून नितेश कराळे मास्तर निवडणूक लढवणार आहेत. कराळे निवडणूक लढवण्यावर ठाम असून त्यांनी या अपक्ष उभे राहण्याची तयारी केली आहे.

नितेश कराळे यांनी आपण येत्या 5 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, असे सांगितले आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅली काढणार असल्याचंही म्हटलं आहे. यावेळी विविध जिल्ह्यांतून आपले समर्थक येणार असल्याचा दावाही कराळे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT