BJP and MNS
BJP and MNS  Sarkarnama
विदर्भ

Chandrapur BJP Assembly Election: भाजपचा नवा डाव; मनसेच्या नेत्यालाच केलं वरोरा विधानसभेचा प्रमुख

सरकारनामा ब्यूरो

Chandrapur News : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. उमेदवारांची चाचपणी सुरु पक्षश्रेष्ठींनी सुरु केली आहे.

भारतीय जनता पक्षाने निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रमुखांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी केली आहे. वरोरा विधानसभा क्षेत्रात मनसेच्या तिकिटावर 2019 ची निवडणूक लढलेले रमेश राजूरकर यांना भाजपच्यावतीने विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या विधानसभा प्रमुखांच्या यादीत रमेश राजुरकर यांचे नाव आहे. वरोरा विधानसभेची जबाबदारी भाजनपने राजुरकरांच्या खांद्यावर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मनसे असलेल्या राजुरकरांनी भाजपमध्ये केव्हा प्रवेश घेतला, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. राजूरकर हे 13 जूनला रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे गेल्या सप्टेंबरमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बदललेली राजकीय समीकरणे बघता भाजपने नवा डाव टाकल्याचे चित्र दिसत आहे. याच क्षेत्रातून प्रतिभा धानोरकर आमदार आहेत.

अकोला लोकसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी खासदार पुत्र अनुप धोत्रे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राजकीय जीवनात प्रथमच महत्त्वाच्या पदावर अनुप यांना नियुक्ती मिळाली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ २००४ पासून सातत्याने भाजपकडे राहिला आहे.

संजय धोत्रे हे १४ व्या लोकसभेत सन २००४ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १५, १६ आणि १७ व्या लोकसभेतही त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेले दोन वर्षांपासून हे गंभीर आजाराने ग्रासले असल्याने सक्रिय राजकारणापासून दूर आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT