Mira Road Murder Case: महिलेच्या हत्येवरुन सुप्रिया सुळे-चित्रा वाघ यांच्यात Twitter वॉर; मोठठ्या ताई, तुम्हाला ‘मगरीचे अश्रू’ ..

Chitra Wagh Targets Supriya Sule : सुप्रिया सुळे तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल..
Mira Road Murder Case
Mira Road Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Mira Road Murder News: आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केल्याची धक्कादायक बाब मुंबईत उघडकीस आली आहे.

या व्यक्तीने तिचे केवळ तुकडेच केले नाही, तर हे तुकडे कुकरमध्ये शिजवून काही कुत्र्याला खाऊ घातल्याची संतापजनक बाबही समोर आली आहे. या घटनेवरुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असतात. त्यावरुन आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

या विषयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजपचे नेत्या चित्रा वाघ यांच्यात समाजमाध्यमांवर जुंपली आहे. "या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे," अशी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळेंच्या टि्वटवर चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.

मुंबईतील मीरा रोड भागातील गीता-आकाशदीप सोसायटीत ही घटना घडली आहे. सोसायटीच्या 7 व्या मजल्यावर 56 वर्षीय मनोज साने याने आपली 36 वर्षीय लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य यांच्यासोबत प्रदिर्घ काळापासून राहत होता.

काही दिवसांपासून मनोजच्या फ्लॅटमधून विचित्र दुर्गंधी येत होती. या दुर्गंधीने त्याचे शेजारी पुरते हैराण झाले होते. त्यांनी कंटाळून या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Mira Road Murder Case
Raut on Narwekar's Statement: सोळा आमदारांबाबत निर्णय लवकरच ; नार्वेकरांच्या विधानावर राऊत म्हणाले, '..तर कोर्टात जाणार'

सुप्रिया सुळे टि्वटमध्ये म्हणतात, "मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे. गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे,"

त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे..

"महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याचे गृहमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे," अशी मागणी सुळेंनी केली होती. सुप्रिया सुळे यांनी टि्वट करताना सीएमओ महाराष्ट्र या ट्विटर हॅडलला टॅगही केले आहे.

Mira Road Murder Case
Sanjay Raut slams Devendra Fadnavis : फडणवीस, तुम्ही विरोधकांच्या हत्येचंही टेंडर काढलं ? ; राऊत संतापले ; 'औरंगजेब' चे सरकार चालू..

सरड्याला पण लाज वाटली असेल…

सुळेंच्या टि्वटनंतर चित्रा वाघ यांनी टि्वट करीत सुळेंचा समाचार घेतला. "सुप्रिया सुळे तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो. तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत.

मुलीला मुस्लिम तरूणाने पळवून नेले. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं. श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिले असते तर तिचेही 35 तुकडे झाले नसते," अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुळेंवर निशाणा साधला आहे. चित्र वाघ यांनी हे ट्वीट करताना एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, भाजपा महाराष्ट्र यांना टॅग केले आहे.

Mira Road Murder Case
Shahu Maharaj On Kolhapur Riot : कोल्हापुरातील राड्याप्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले; पोलिसांनी...

हे ही दुर्दैवच!

"वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच! मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरीचे अश्रू’ गाळण्याची गरज नाही, मोठठ्या ताई…," असे चित्रा वाघ यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com