MNS Workers
MNS Workers Sarkarnama
विदर्भ

MNS News: पीक विमा कंपनीच्या दाराला हार घालून केले पिंडदान, पीक विम्यासाठी मनसे आक्रमक !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : पीक विमा कंपन्यांचं चाललंय काय, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसह अनेकांना पडला आहे. त्यासाठी आजवर अनेक आंदोलने झाली. पण शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या प्रश्‍नावर आंदोलने केली आहे. आता या प्रश्‍नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.

विदर्भात मुसळधार पावसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्रीय समिती व राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला. मात्र पीक विमा कंपन्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला नाही. आणेवारीच्या नावाखाली अडवणूक करत असल्याने अनेकदा तहसीलदार व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र पंतप्रधान पीक विमा कंपनीचे कर्मचारी हे कार्यालय बंद करून गायब होतात.

शेतकरी हा चकरा मारून मारून त्रस्त झाला आहे. या समस्येवर चर्चा करू प्रश्‍न निकाली काढण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर हे काल कार्यकर्त्यांसह पीक विमा कंपनीच्या कार्यालयात गेले. कार्यालय बंद करून अधिकारी कर्मचारी गायब होते.

हे बघून कार्यकर्त्यांनी दुरूगकर यांच्या नेतृत्वात तेथेच आंदोलन सुरू केले. कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला हार घालून तेथेच पीक विमा कंपनीचे पिंडदान केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

आंदोलनात सचिन चिटकुले, प्रभारी जिल्हा उपाध्यक्ष रितेश कान्होलकर, अनिलजी नेहारे, दिपक ठाकरे, साहिल ढोकणे, तन्मय तेलरांधे, महेश शाहु, तुषार भुबर, राहुल वेले, स्वाती जयस्वाल, वैष्णवी चिंचोळकर, अंजनाबाई महाजन, लता वाघमारे, मंदा चानपुरे, आकाश पिरोडीया, गोपाल ठोसर, अतुल कांबळे, आश्विन पुंडे, राकेश चौधरी, मुकेश मुंडले, प्रीतम कम्पलीवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यामध्ये शेतक-यांच्या पीक विम्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा, बँकांनी जिल्ह्यातील एकाही शेतक-यांचे पीक विम्याचे पैसे न थांबवता शेतक-यांना वाटप करा या मागण्या मनसेने (MNS) केल्या आहेत. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान यासह पीकविमा आणि नुकसान भरपाई पासून वंचित शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी जाहीर केले होते.

मतदारसंघातील शेतकरी (Farmers) दोन पिके घेणारा निर्माण व्हावा यासाठी सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण या सर्व घोषणा हवेतच विरल्याचा आरोप आदित्य दुरूगकर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT