The problem of hawkers of Dombivli is not solved : डोंबिवलीतील शिवसेना - शिंदे गटातील एक मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो, म्हणून डोंबिवलीच्या स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही. पोलिसांनी पुरावा मागितला तर आम्ही पुरावे देऊ, असा गौप्यस्फोट मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे गटावर घणाघाती आरोप करताना केडीएमसी आयुक्त यांच्यावरही मनसे आमदार पाटील यांनी निशाणा साधला आहे. डोंबीवली स्टेशनबाहेर पुन्हा एकदा फेरीवाले बसायला सुरुवात झाली आहे. रेल्वे स्टेशनपासून १५० मीटर परिसरात फेरीवाले बसू देऊ नये, असा न्यायालयाचा आदेश असूनसुद्धा महापालिका प्रशासन लक्ष देत नाही आहे, तर दुसरीकडे 'नो फेरीवाला झोन'मध्येसुद्धा फेरीवाल्यांचे बस्तान मांडले आहे.
यातच आता डोंबीवलीमधील थोर व्यक्तींचा अवमान होत असलेला व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. डोंबीवली भाजपचे आमदार आणि मंत्री यांनी डोंबीवली पूर्वेला स्टेशनच्या बाहेर डोंबिवलीमधील थोर व्यक्तींचे फोटो आणि माहिती देत भिंतीवर सुशोभीकरण केले होते, मात्र याच फोटोंवर फेरीवाल्यांनी आपले सामान लटकवत आपला धंदा सुरू केला आहे, याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
दरम्यान याकडे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण कधी घालणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.तर दुसरीकडे केडीएमसी आयुक्तांनी स्टेशन परिसरातील पाहणी केली होती आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल असेही सांगितले होते, मात्र ते आश्वासन हवेत विरले. प्रत्यक्षात मात्र फक्त दिखावा कारवाई करण्यात आली आहे.
याच विषयावरून मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. राजू पाटील यांनी सांगितले की, डोंबिवलीतील (Shivsena) शिवसेना-शिंदे गटातील एक मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो, म्हणून डोंबिवलीतील स्टेशनच्या बाहेरील फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही. पोलिसांनी पुरावा मागितला तर आम्ही पुरावे देऊ.
कल्याण शीळ रस्त्यावर गर्डर टाकण्याचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे, त्याठिकाणी बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र केडीएमसी आयुक्त कारवाई करीत नाहीत. कंट्रोल रूममध्ये बसून पैसे गोळा करण्यास त्यांना सांगण्यात आल्याचाही गंभीर आरोप आमदार (MLA) पाटील यांनी यावेळी केला आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.