Sachin Ahir and Bhai Jagtap Sarkarnama
विदर्भ

Monsoon Session 2023 : आमच्या मतदारसंघातले नागरिक काय बांगलादेशातून आलेत काय? अहीर भडकले...

Sachin Ahir : निधी वाटपावरून आज विरोधक चांगलेच आक्रमक झाले.

सरकारनामा ब्यूरो

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : विधान परिषदेच्या सभागृहात निधी वाटपावरून आज (ता. २४) विरोधक चांगलेच आक्रमक झाले. सत्ताधारी आणि विरोधक, असा फरक केला जात आहे, असे म्हणत आमच्या मतदारसंघातील नागरिक काय बांगलादेशातून आले आहेत काय, असा संतप्त सवाल आमदार सचिन अहीर यांनी केला. (An angry question was asked by MLA Sachin Ahir)

आमदार अहीर म्हणाले, ज्यांनी लोकांनी तुम्हाला मतदान केले नाही, त्यांच्या मतदारसंघात निधी द्यायचा नाही, असे काही धोरण सरकारचे ठरले आहे का? आमची फाईल डीपीप्रमाणे येणार नाही. अनेक निधी कसे दिले जातात, हेही आम्हाला माहिती आहे. उपमुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या आणि आजही आहेत. अजित पवारांना आम्ही लॉबीमध्ये भेटलो होतो, तेव्हा ते म्हणाले की, काही चिंता करू नका. पण ही चिंतेचीच बाब आहे.

`सचिन भाऊ हुशार आहेत..'

अजित पवारांकडे सुपर पॉवर आल्यामुळे आमच्या मित्रांना चांगला निधी मिळाला, असे अहिरांनी म्हणताच, (Amol MItkari) आमदार अमोल मिटकरी, मनीषा कायंदे ‘आम्हाला निधी मिळाला नाही’, असे म्हणाल्या. त्यावर त्यांनाही निधी द्या, असे अहिरांनी सुचवले. तेव्हा ‘सचिन भाऊ हुशार आहेत, तुम्ही असं म्हणावं म्हणून ते बोलले. रेकॉर्डवर आणायचं होतं त्यांना.’ असं उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या. एकंदरीतच भावना संतप्त होत्या, तरीही ही चर्चा खेळीमेळीत झाली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही निधी वाटपाबाबत संताप व्यक्त केला. भाई जगताप म्हणाले, निधीच्या बाबतीत अनेक वेळा चर्चा झाल्या. उपमुख्यमंत्र्यांना अर्थ खात्याचा चांगला अभ्यास आहे, हा आमचा गेल्या २५ वर्षांचा अनुभव आहे. निधी वाटपाचे राजकारण न करता योग्य वाटप करावे. सापत्नक व्यवहार बघायला मिळतो.

नवीन प्रघात महाराष्ट्राच्या (Maharashtra) परंपरेला मान्य नाही. असं कधी झालं नव्हतं, जे आज होतेय. नवीन प्रघात पडला आहे., याची भीती आहे. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, इतकं बोलायचं की ते खरच वाटेल, अशी परिस्थिती झाली आहे. आज (ता. २४) सकाळीच एका वाहिनीवर बघितलं की निधीचे समान वाटप झाले. मग आमच्या सदस्यांना विचारले, तर सगळ्यांनी नकारार्थी उत्तर दिले. हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही, असे भाई जगताप (Bhai Jagtap) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT