Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : निधी वाटपात असमानता होत असल्याचा मुद्दा आज विधान परिषदेत चांगलाच तापला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाई जगताप, सचिन अहीर आदी सदस्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भातील इतिहास सभागृहाला सांगितला. त्यानंतर विरोधकांची बोलती बंद झाली. (There are usually proposals regarding allocation of funds)
यासंदर्भात फडणवीस म्हणाले, निधी वाटपाच्या संदर्भात साधारणतः प्रस्ताव येत असतात. त्यानंतर बजेट व मागण्या अंतिम होतात. या प्रक्रियेत सर्वच प्रस्ताव मंजूर होतात, असे नाही, काही होतही नाहीत. आता दुर्दैवानं थोडं इतिहासात जावं लागेल, असं म्हणत त्यांनी जुन्या गोष्टी उकरून काढल्या.
फडणवीस म्हणाले, पाच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा एकदाही या सभागृहात अशी चर्चा झाली नाही. त्यापूर्वी एकदा झाली होती, जयंत पाटील असताना चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही कोर्टात गेलो होतो. जेव्हा उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा एक नवा पैसा विरोधी आमदारांना मिळाला नाही. त्या अडीच वर्षात एक फुटकी कवडीदेखील आम्हाला मिळाली नव्हती. यामध्ये इतर कुणाला दोष देता येणार नाही. कारण राज्याचा प्रमुख ठरवतो. त्याच्या सहीशिवाय एक ना पैसा कुणाला खर्च करता येत नाही.
`गाय मारली म्हणून वासरू मारणारे` आम्ही नाही..
विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला तेव्हा निधी दिला नाही. एक नवीन पायंडा पाडला. तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारावे, या मताचे आम्ही नाहीच. विरोधी पक्षनेत्यांनी आज आम्हाला जे शिकवलं, हे तेव्हाच्या सरकारला शिकवले असते, तर ही परिस्थिती आलीच नसती. मी तुम्हाला कॉंग्रेसच्या १५ लोकांची नाव देतो की, ज्यांच्या कामांवरची स्थगिती स्थगिती आम्ही उठवली आहे.
मेरीटच्या आधारावर ती उचलली गेली आहे. नवे सरकार (Govenment) आल्यावर स्थगिती देण्यात आली होती. प्रश्न हा होता की, विरोधी पक्षाच्या आमदारांना काहीच मिळाले नाही आणि सत्ताधाऱ्यांच्या आमदारांना मिळाले. कुठल्या ना कुठल्या हेडमध्ये मिळाले विरोधी आमदारांनाही निधी मिळालेला आहे.
आम्हाला २५ तर तुम्हाला १० कोटी मिळाले असतील, पण मिळाला, हे नक्की, असे फडणवीसांनी ठासून सांगितले. याऊपरही सर्व आमदारांनी निधी मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आशावादी भूमिका मांडल्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.