Sudhir Mungantiwar, Kapil Patil and Neelam Gorhe Sarkarnama
विदर्भ

Monsoon Session 2023 : ‘हे’ वर्तमान असेल, तर राज्याचं भविष्य काही खरं नाही, असं का म्हणाले कपिल पाटील?

सरकारनामा ब्यूरो

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : या सभागृहात दोन्हीकडे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आहेत. येवढी मोठी घटना घडल्यानंतरही अनुयायी तक्रार करत नाहीत, हे महाराष्ट्राचं वर्तमान असेल, तर महाराष्ट्राचं भविष्य काही खरं नाही, असे आमदार कपिल पाटील आज (ता. २१) सभागृहात खारघरच्या प्रश्‍नावर चर्चा सुरू असताना म्हणाले. (So the future of Maharashtra is not certain)

धर्माधिकारी यांच्यामुळे अनेक लोक व्यसनमुक्त झालेले आहेत. अनेक महिला मला आजही भेटतात आणि सांगतात की, धर्माधिकारी यांच्यामुळे आमचे संसार कसे वाचले आणि आज सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे तुमचं वक्तव्य मान्य नाही. त्यांचे संस्कार वाईट आहेत, अशा आशयाचं तुमचं वक्तव्य चुकीचं आहे. ते तुमचं व्यक्तिगत मत असू शकेल. पण मी त्याच्याशी सहमत नाही, असे म्हणत उपसभापती नीलम गोऱ्हे कपिल पाटलांच्या त्या वक्तव्याचा विरोध नोंदवला.

खारघरच्या प्रश्‍नावर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, धर्माधिकाऱ्यांचे काम उच्च दर्जाचे आहे, केलेली मदत तुम्ही कुणाला सांगू नये, असे त्यांनी तेव्हा म्हटले होते. त्यांनीही पाच लाखाची मदत केली. या प्रकरणी ज्यांनी पीआयएल दाखल केली, त्यांनीही मदत केली नाही. राजकीय पक्षाच्या लोकांनाही मदत केली नाही. पण शासन आणि धर्माधिकारी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत केली.

मंत्रालयात (Mantralaya)आग लागली होती. तेव्हा ८६ हजार फाईल जळाल्या होत्या आणि दोन कर्मचारी मरण पावले होते. तेव्हा त्या घटनेचीही न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी झाली होती. अशा घटना शॉर्ट सर्कीटने होतात, न्यायालय त्याची चौकशी करत नाही, असे सांगताना मुनगंटीवारांनी इतिहासातील काही घटनांचे दाखले दिले.

या प्रकरणात सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. त्यावर अशा प्रकरणांत राजीनामा देण्याचे सर्व प्रसंग तपासले मांढरादेवीच्या प्रकरणात राजीनामा दिला नव्हता. नागपुरातील (Nagpur) गोवारीच्या प्रकरणाचाही अहवाल वाचला. त्यामध्ये ‘शेवटी १९९४ ला चौकशी समिती बसवली आणि १९९८ ला अहवाल आला. जे निरपराध गेले, ही घटना दुर्दैवी आहे’. असा उल्लेख केला आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

जेथे सरकारची कमी असेल, तेथे उणीव भरून काढू. चुका असतील त्या दुरुस्त करू. हा कार्यक्रम राजकीय हेतूने करण्याचा प्रश्नच नाही, कारण तेव्हा कोणतीच निवडणूक नव्हती, असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सभागृहाला सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT