Rahul Narvekar, Kishor Jorgewar and Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Monsoon Session 2023 : 'आमच्यामुळे हे सरकार आहे; गरज संपत नाही, म्हणून अजित दादा सोबत आलेत ना...'

Kishor Jorgewar : सरकार डेंजर झोन मध्ये येते, तेव्हा वाचविणारे आम्हीच आहोत ना !

सरकारनामा ब्यूरो

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : 'आमच्या 50 लोकांमुळे हे सरकार आलेले आहे. मात्र आता तुमचं लक्ष आमच्याकडे कमी होत आहे. तुमच पूर्ण लक्ष उजवीकडे आहे. सरकार डेंजर झोन मध्ये येते, तेव्हा वाचविणारे आम्हीच आहोत ना',असे म्हणत चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सरकारमध्ये अपक्षांची गरज अधोरेखीत केली. (Kishore Jorgewar highlighted the need for independents in the government)

आज (ता. १९) पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी 'पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन'वर चर्चा सुरु होती. यावेळी चंद्रपूर शहरात मंगळवारी (ता. १८) झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार उभे झाले. यावेळी सभागृह अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोरगेवार यांना मध्येच थांबवत 'माहिती काय आहे' असे बोलत 'पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन' मांडायला सांगितले.

आमदार किशोर जोरगेवार यांनी या सरकारमध्ये (Government) असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची आठवण कदाचित सभागृहाला करुन दिली असावी, अशी चर्चा रंगली आहे. आमदार जोरगेवार बोलत असतानाच आता अपक्षांची गरज नाही, असा आवाज सभागृहात आला. यावर जोरगेवार म्हणाले की, 'गरज कधीच संपत नाही. म्हणूनच सरकार आणखी पॉवरफुल करण्यासाठी अजित पवार सरकारमध्ये आले' असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना आमदार जोरगेवार (Kishor Jorgewar) म्हणाले. चंद्रपूरात (Chandrapur) झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ देण्यात यावे, मदत केंद्र सुरु करण्यात यावे, येथील नाल्यांच्या खोलीकरण रुंदीकरणासाठी निधीची घोषणा करण्यात यावी.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT