Ambadas Danve and Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Monsoon Session 2023 : आम्हाला काहीच नाही, अन् अजित पवारांच्या आमदारांना ५० कोटी, सर्व पुरावे आहेत, पण…

Ambadas Danve : अंबादास दानवेंनी सभागृहात पुरावेच काढले.

सरकारनामा ब्यूरो

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : निधी वाटपात असमानता असल्याचा मुद्दा विधान परिषदेत आज (ता. २४) चांगलाच तापला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांना ५०-५० कोटी रुपयांचा निधी अन् आमच्या आमदारांना काहीच नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभागृहात पुरावेच काढले. (Ambadas Danve took the evidence in the hall)

दानवेंनी असं म्हणताच, आमदार अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे उभे झाले आणि सभागृहात गोंधळ उडाला. तेव्हा कोणत्या बंगल्याहून अजित पवार गटाच्या आमदारांना फोन गेले, कोणत्या नंबरवरून गेले, कुणी केले, हे सर्व दाव्यासहित सांगेन. सभागृहात मला हे सांगायला भाग पाडू नका, असे म्हणत दानवे पुन्हा संतापले. यावेळी दानवेंच्या मदतीला आमदार सचिन अहीर धावले.

यावेळी अंबादास दानवे - सचिन अहीर विरुद्ध अमोल मिटकरी - अनिकेत तटकरे असा सामना सुरू झाला. दरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदस्यांना ही ‘काय पद्धत आहे का? मिटकरी, तटकरे तुम्ही खाली बसा’ असे म्हणत खाली बसण्यास बजावून सभागृह शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दानवे म्हणाले, विधान परिषदेच्या आणि विधान सभेच्या काही आमदारांना निधीची रक्कम कमी-अधिक होऊ शकते, मान्य आहे.

कुणाला ४० कोटी, कुणाला ५० कोटी तर कुणाला ३० कोटी, असंही होऊ शकतं. पण पण काहींना ५०-५० कोटी आणी काहींना काहीच नाही, असं कसं चालेल? भाजपच्या आमदारांना २० कोटी, शिंदेंच्या आमदारांना ४० कोटी आणि अजित पवारांच्या आमदारांना ५० कोटी आहे. असं वाटप सुरू आहे. हे कसं खपवून घेणार, असा सवाल दानवेंनी केला.

निधीचे समान वाटप झाले, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे म्हणणे चुकीचे आहे. नवा निधी तर फार लांब, मागील वर्षीचाही निधी अद्याप मिळाला नाही. निधी जनतेच्या टॅक्सच्या पैशातून दिला जातो. ज्या मतदारसंघांत निधी दिला नाही, तेथील जनता कर भरत नाही का? आमचे आमदार, कॉंग्रेसचे (Congress) आमदार यांच्या मतदारसंघात निधी का नाही दिला, अशा एक ना अनेक प्रश्‍नांचा भडिमार दानवेंनी सत्ताधाऱ्यांवर केला.

मी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलो. तेथे ज्यांनी मला मतदान केले, ते नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्या मतदारसंघात कामे करायची नाहीत का? पक्षाचा अभिनिवेश असू शकतो. तो वेगळा मुद्दा आहे. परंतु सरकारच्या (Government) माध्यमातून निधीचे असमान वाटप निषेधार्ह आहे. लोकप्रतिनिधींवर हा अन्याय आहे, असेही अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT