Ambadas Danve News : गद्दारांनो ते नऊ मंत्री आता तुमच्या मांडीवर येऊन बसलेत..

Shivsena (UBT) अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Ambadas Danve- CM Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : महाविकास आघाडी सरकारमध्ये असतांना राष्ट्रवादीचे नेते तथा तत्कालीन अर्थ मंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेच्या `त्या`, चाळीस आमदारांनी बंड केले. (Ambadas Danve News) आता तेच अजित पवार पुन्हा सत्तेत सहभागी झाले. अर्थ मंत्री झालेल्या अजित पवारांनी पुरवणी मागण्यांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी भरघोस निधीची तरतूद केली. यावरून शिंदे व भाजप गटात नाराजीचा सूर निघत असतांनाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांवर निशाणा साधला आहे.

Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Farmers Report News : केंद्रेकरांचा अहवाल चुकीचा, की सरकारची अडचण करणारा ?

ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, असे म्हणत होतात, ते (NCP) राष्ट्रवादीचे नऊजण आता तुमच्या मांडीवर येवून बसले आहेत. तेही ठासून, असा टोला दानवे यांनी लगावला आहे. एका वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कामकाजावर नाराज होऊन शिवसेनेतील (Shivsena) ४० आमदारांनी पक्ष सोडला होता.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री असून सुद्धा निधी वाटपात आम्हाला न्याय देत नाहीत. अजित पवार हे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या आमदारांपेक्षा जास्त निधी देत होते. त्यामुळे आमचे राजकीय भविष्य अंधातरी दिसत होते व कुचंबणा होत होती. यामुळे आम्ही शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता असे ४० आमदारांनी सांगितले होते.

परंतु काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसेच काहीच दिवसात सरकारमध्ये सहभागी होऊन त्यांनी अर्थ मंत्रालयासारखे महत्त्वपूर्ण खाते सुद्धा मिळविले.आता याच अर्थ खात्याचा उपयोग करत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.

चालू विधान मंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पुरवण्या मागण्यांमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये सर्वात जास्त नाशिक येथील देवळाली मतदारसंघातील सरोज अहिरे यांना ४० कोटी रुपयांचा निधी देवू केला आहे. ज्यांच्या मांडीला मांडी नको म्हणून, बाहेर पडलेल्या ४० मंडळींच्या मांडीवरच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे ९ जण येऊन बसले. ते पण एकदम ठासून! हाच या कहाणीचा सध्याचा 'अर्थ' आहे, असा टोला देखील दानवे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com