Yavatmal News Sarkarnama
विदर्भ

Yavatmal News : पथारी व्यावसायिकांकडून महिन्याला 'वसुली'; राष्ट्रवादीचा सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप

NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेतली.

सतीश हरिश्चंद्र येटरे

Yavatmal News : फुटपाथ व्यावसायिकांना कारवाईचा धाक दाखवत थेट नागपूर येथील महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्ताने त्यांच्याकडून हप्तेखोरी चालविली आहे. महिन्याकाठी फूटपाथ व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये उकळण्यात येतात. ही धक्कादायक बाब चव्हाट्यावर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत तक्रार दिली आहे. एवढेच नव्हेतर त्या संबंधित सहाय्यक आयुक्तांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

डॉ. वऱ्हाडे असे हप्तेखोरीचा आरोप होत असलेल्या सहाय्यक आयुक्ताचे नाव आहे. ते नागपूर महानगरपालिकेच्या धर्मपेठ झोनचे प्रमुख अधिकारी आहेत.त्यांच्याकडे नागरिकांच्या समस्या सोडविणे, कर आकारणी, कर वसुली, फूटपाथवरील अतिक्रमण काढणे, अनधिकृत बांधकामावर होऊ न देणे, अशा विविध जबाबदाऱ्या आहेत. मात्र अधिकाराचा दुरुपयोग करीत त्यांनी नागरिक आणि व्यावसायिकांना वेठीस धरीत अक्षरशः त्यांची लूट चालविली आहे.

अनधिकृत बांधकामांना आश्रय देणे, अतिक्रमणच्या नावावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करणे, फेरीवाले आणि फूटपाथ व्यावसायिकांना त्यांच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी महिन्याकाठी प्रत्येकी पाचशे रुपये वसूल करणे यामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या अनेक कारनाम्यांच्या तक्रारी व्यावसायिक आणि नागरिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्याकडे केल्या.

त्याची दखल घेत प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेतली. तसेच तक्रार देत धरमपेठ झोन मधील भ्रष्टाचारी सहायक आयुक्त डॉ. वऱ्हाडे यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी शहराध्यक्ष अध्यक्ष प्रशांत यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश संघटक सचिव हाजी सोहेल पटेल, माजी नगरसेवक राजेश माटे, सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष अरविंद ढेंगरे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष वसीम अन्सारी, उत्तर नागपूर अध्यक्ष राकेश बोरीकर, मुमताज बाजी उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT