Morshi Meat Party Case Sarkarnama
विदर्भ

Morshi Meat Party Case : मोर्शीच्या कथित प्रशासकीय 'मटण पार्टी'चा ड्रोन व्हिडीओ शूट करणाऱ्या रमाकांत गावंडेंवर जीवघेणा हल्ला! 'माझा संतोष देशमुख करायचा होता'

Ramakant Gawande, who filmed alleged Morshi Municipal Council meat party using drone, claims he was abducted and assaulted 7-8 men. He alleges knife threat and says, 'They wanted make me another Santosh Deshmukh.' A Morshi bandh has been called : मोर्शी नगरपरिषदेतील पार्टीचे चित्रीकरण करणाऱ्या रमाकांत गावंडेंना शेतातून उचलून जंगलात बेदम मारहाण; चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी, 7 ते 8 जणांवर हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप; घटनेच्या निषेधार्थ उद्या मोर्शी बंदची हाक

Pradeep Pendhare

Morshi Municipal Council Controversy : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांची मटण पार्टी झाल्याचा व्हिडीओ ड्रोनद्वारे चित्रित करणारे रमाकांत गावंडे यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात गावंडे जखमी झाले असून, स्वतः गावंडे यांनी हल्ल्याबाबत माहिती दिली. 'माझा संतोष देशमुख करायचा होता', असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

रमाकांत गावंडे यांना मोर्शी (Amravati) येथील खुल्या कारागृह परिसरातील शेतातून त्यांना जबरदस्तीने नेऊन जंगलातील निर्जन ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात 7 ते 8 जण सहभागी असल्याचा दावा गावंडे यांनी केला आहे. सध्या रमाकांत गावंडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मला बुक्क्यांनी आणि लाथांनी मारहाण (Crime) करण्यात आली. एका व्यक्तीच्या हातात चाकू होता. हाललास तर तुला संपवून टाकीन, अशी धमकी देण्यात आली. माझा संतोष देशमुख करायचा होता, असा आरोप जखमी रमाकांत गावंडे यांनी केला आहे.

रमाकांत गावंडे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या गुरूवारी मोर्शी शहर बंदची सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने हाक दिली आहे. मोर्शीचा बिहार झाला आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते नीलेश रोडे यांनी दिली. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सत्ताधारी शिंदे शिवसेनेची अडचण

मोर्शी शहरातील नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या इमारतीच्या कार्यालयावर मटण पार्टीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. यामुळे मोर्शी नगरपरिषदेत सत्ताधारी एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबरच प्रशासनाची चांगलीच अडचण झाली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, प्रशासनाला शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बजावली.

मटण पार्टीवरून भाजप आक्रमक

मोर्शी नगरपरिषदेतील नगराध्यक्ष प्रतीक्षा गुल्हाने यांनी सावरासावर केली. कर्मचारी सेवानिवृत्ती आणि दिवाळी फराळाचा कार्यक्रम होता, असे सांगितले. याचवेळी महायुतीमधील त्यांचा मित्रपक्ष भाजप या पार्टीवरून आक्रमक होत, नगराध्यक्षांविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी लावून धरली आहे. जिल्हाधिकारी येरेकर यांच्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या नोटीशीवर मोर्शी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी पराग वानखडे यांनी, कर्मचारी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता, असे सांगून सावरासावरी केली आहे.

कायदेशीर कारवाईकडे लक्ष

सत्ताधारी एकनाथ शिंदे शिवसेना आणि मोर्शी नगरपरिषद प्रशासन सावरासावरीत गुंतले असताना, ड्रोनद्वारे चित्रीकरण करणारे रमाकांत गावंडे यांच्यावर हल्ला झाल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. हल्लेखोर कोण होते? हल्ल्याचा उद्देश स्पष्ट असून, रमाकांत गावंडे यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांच्या काळातच गुन्हेगारी वाढली आहे, अशा एक ना अनेक प्रश्नांना मोर्शी तोंड फुटले आहे. रमाकांत गावंडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT