

Shankar Maharaj Math Annachhatra : IAS तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील धनकवडी येथील सद्गुरू शंकर महाराज मठातील अन्नछत्रासाठी अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकाकडे अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार परवाना किंवा नोंदणी नसल्याचे समोर आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी तेथे तपासणी केली असता ही बाब समोर आली आहे.
पुण्यातील (Pune) धनकवडी येथील सद्गुरू शंकर महाराज मठातील अन्नछत्रासाठी अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकाकडे अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत तयार केले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत आढळले. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करून वैध अन्न परवाना किंवा नोंदणी प्राप्त करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. सद्गुरू शंकर महाराज मठाशी निगडीत असलेल्या अन्नछत्रासाठी बनवल्या जाणाऱ्या व्यावसायिकांवर ही कारवाई खळबळ उडाली आहे.
‘एफडीए’चे (FDA) अन्न सुरक्षा अधिकारी के. एल. सोनकांबळे यांनी सोमवारी धनकवडी येथील श्री सद्गुरू शंकर महाराज मठाजवळील अन्नछत्र समितीच्या अन्न तयार करण्याच्या ठिकाणाची तपासणी केली. मठाशेजारील जागेत अतिक्रमण करून अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचेही समोर आले आहे.
या अन्नपदार्थांचे प्रसाद म्हणून वितरण होत असल्याने प्रशासनाने त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांनी दिली.
अन्नछत्रासाठी अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व्यक्तीकडे कोणताही वैध परवाना आढळून आला नाही. संबंधित व्यावसायिकाने मठ परिसरातील कोणत्याही अधिकृत जागेत अन्न तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह परवान्यासाठी अर्ज केल्यास खातरजमा करून परवानगी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.