Morshi Mutton Party Sarkarnama
विदर्भ

Morshi Mutton Party Case : 'मटण पार्टी' भोवणार! मोर्शीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; सत्ताधारी शिंदे शिवसेनेविरोधात भाजप संघर्षाच्या तयारीत

Morshi Mutton Party Case: Amravati Collector recommends suspension of Chief Officer Parag Wankhade. Probe panel formed as BJP-Shinde Sena tensions escalate : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची शासनाकडे कारवाईसाठी शिफारस; मुख्याधिकारी पराग वानखडे यांचे स्पष्टीकरण असमाधानकारक, चौकशी समिती स्थापन; भाजप-शिंदे शिवसेनेतही राजकीय संघर्ष पेटला

Pradeep Pendhare

Morshi Municipal Council Mutton Party Case : अमरावती जिल्ह्यातील एकनाथ शिंदे शिवसेनेची सत्ता असलेल्या मोर्शी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या 'मटण पार्टी'च्या प्रकरणी प्रशासकीय पातळीवर कारवाईसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

मोर्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पराग वानखडे आणि त्यांचे प्रशासकीय पातळीवरील सहकाऱ्यांना हे प्रकरण चांगलेच भोवणार असे दिसते आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी, मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्याविरोधात सेवेतून निलंबनाची प्रस्ताव शासकीय पातळीवर सादर केल्याची सूत्रांची माहिती आहे. नगरपालिक विभागाचे अपर सचिवांकडे हा प्रस्ताव सादर झाला आहे.

मोर्शी नगर परिषदेचे (Municipal Council) मुख्याधिकारी 'मटण पार्टी'चा समाज माध्यमांवर व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. यानंतर प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर एकच खळबळ उडाली. मोर्शी प्रशासनाचा कारभाराचे राज्यातील दुष्काळी परिस्थितीत धिंडवडे निघाले. मोर्शी नगरपरिषदेच्या प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरून सावरासावरीचा प्रयत्न झाला. परंतु मोर्शी नगरपरिषद आणि अमरावती जिल्हा प्रशासनावर यावरून चांगलाच दबाव वाढला आहे.

अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (Collector) आशिष येरेकर यांनी, मोर्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पराग वानखडे यांनी शिस्तभंगाची नोटीस बजावून सोमवारी म्हणणे मागून घेतले. पराग वानखडे यांनी सादर केलेल्या सावरासावरीच्या उत्तर समाधानकारक नसल्याचे निरीक्षण नोंदवून, आशिष येरेकर यांनी त्यांच्याविरोधात निलंबनाचा प्रस्ताव शासकीय पातळीवर सादर केला.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा सहआयुक्त सुप्रिया टवलारे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य सचिव म्हणून अचलपूरचे मुख्य अधिकारी धीरजकुमार गोहोड, तर सदस्य म्हणून कर व प्रशासकीय अधिकारी चेतन ढेवले यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी समितीचा अहवाल देखील कारवाईसाठी निर्णायक ठरणार आहे. या अहवालाकडे देखील लक्ष लागले आहे.

प्रशासकीय पातळीवर या हालचाली सुरू असतानाच, सकाळीच ड्रोनद्वार चित्रीकरण करणाऱ्या रमाकांत गावंडे यांच्यावर सात ते आठ जणांनी जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकाराने अधिकच खळबळ उडाली असून रमाकांत गावंडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या गुरूवारी मोर्शी शहर बंदची सामाजिक कार्यकर्त्यांनी हाक दिली आहे.

प्रशासकीय पातळीवर कारवाई सुरू असतानाच, राजकीय पातळीवर, महायुतीमधील मोर्शी नगरपरिषदेतील सत्ताधारी एकनाथ शिंदे शिवसेनेविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रतीक्षा गुल्हाने यांना हटवण्यासाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. भाजपच्या या कटकारस्थानांविरोधात एकनाथ शिंदे शिवसेनेने देखील भाजपने नगरपरिषदेतील कारभाराचे दाखले देण्यास सुरूवात केली आहे. यातून महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT