His health had deteriorated : कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर शनिवारी (ता, २७) त्यांच्यावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीला नेण्यात आले. आज त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. (He was treated in a private hospital in Nagpur)
खासदार धानोरकर यांची प्रकृती अति गंभीर असून ते उपचाराला प्रतिसाद देत नाहीये, अशी चर्चा आज सकाळपासून नागपूरपासून ते चंद्रपूर आणि विदर्भभर सुरू झाली. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. पत्रकारही एकमेकांना फोन करून सत्य काय ते विचारू लागले. त्यानंतर ‘सरकारनामा’ने त्यांचे निकटवर्तीय असलेल्या व्यक्तीशी भ्रमणध्वनीवरून माहिती घेतली.
निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना किडणी स्टोनचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर नागपुरातील (Nagpur) एका खासगी रुग्णालयात किडणी स्टोनवर (शनिवारी) उपचार करण्यात आले. पण त्यानंतर काल त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे नेण्यात आले.
‘माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेत आहे, असा संदेश खासदार धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांच्या कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आला. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीशी संपर्क केला असता, ‘सात वर्षांपूर्वी खासदार धानोरकर यांनी ‘वेट लॉस’साठी एक ऑपरेशन केले होते. त्या ऑपरेशनमुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन झाले होते.
आतड्यांमध्ये झालेल्या इन्फेक्शनवर दिल्लीतील (Delhi) वेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्या उपचार सुरू आहेत. उपचारांना ते उत्तम प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. लवकरच बरे होऊन ते परत येणार आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.