MP Balu Dhanorkar Health news : वडिलांचे निधन; खासदार बाळू धानोरकरांचीही प्रकृती बिघडली; तातडीने दिल्लीला...

Congress News : खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे.
Balu Dhanorkar News
Balu Dhanorkar NewsSarkarnama
Published on
Updated on

MP Balu Dhanorkar Health News : खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. धानोरकर यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना आता नागपूरहून विशेष एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला हलवले जाणार आहे.

धानोरकर यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पोटात दुखू लागल्याने त्यांना तातडीने दिल्लीला हलवले आहे, या संदर्भातील माहिती त्यांनीच दिली फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे.

Balu Dhanorkar News
New Parliament Building News : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राहुल गांधींची एका वाक्यात प्रतिक्रिया

धानोरकर (Balu Dhanorkar) यांना काल संध्याकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते. आजारपणाविषयी कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून काळजी व्यक्त केली जाऊ लागल्याने धानोरकर यांनी फेसबुक पोस्ट करत आजारपणाविषयी माहिती दिली.

आपल्या पोस्टमध्ये धानोरकर म्हणाले, काल शनिवारी नागपूर (Nagpur) येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार केले. मात्र, आज पोटात दुखू लागल्याने तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे जात आहे. माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेत आहे, अशी माहिती त्यांनी दिला आहे.

Balu Dhanorkar News
NCP Vs Congress : अजितदादा, खडा टाकू नका : पुण्याच्या जागेवरून काँग्रेस नेत्याने सुनावले

दरम्यान, धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचे शनिवारी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. नारायणराव धानोरकर यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील भद्रावती या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com