MP Balu Dhanorkar News : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोळसा उद्योगावर आधारित हायड्रोजन, मिथेनॉल, अमोनिया तयार करण्याचा २० हजार कोटींचा प्रकल्प भद्रावती येथे मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात केली. यामुळे दहा हजार युवकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे चंद्रपूर येथील खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी दिली.
या भागात टेक्सटाईल पार्क उभारला गेल्यास या उद्योगांमुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. टेक्सटाईल पार्कवर आधारीत उद्योगांनादेखील चालना मिळेल व सदर उद्योग हा विदर्भाच्या आर्थिक उन्नतीत भर घालणारा असेल. टेक्सटाईल पार्क उभारण्यासंदर्भात तात्काळ निर्णय घेऊन प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात यावा. तसेच एमपीएससी पूर्वीप्रमाणेच ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेणे, वन्यप्राणी बंदोबस्त, विविध विभागांतील रिक्त जागा भरण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
काल नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात खासदार व आमदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मानस व पार्थ धानोरकरसुद्धा उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील यवतमाळ जिल्हा पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे. त्याचबरोबर विदर्भातील अनेक जिल्ह्यांत कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात होते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक जागा, वीज व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून मागील सरकारच्या काळात टेक्सटाईल पार्क उभारण्याच्या संदर्भाने तत्कालीन उद्योगमंत्र्यांशीदेखील चर्चा झाली होती. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनीदेखील याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते.
यांच्याकडे पाठपुरावा करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पीयूष गोयल व राज्यातील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे कडे सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्न केले. याआधी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क उभारण्याची मागणी लोकसभेत केली होती. त्यावर केंद्रीय वस्त्र राज्य मंत्र्यांनी २७ एप्रिल २०२२ला राज्यांकडून प्राथमिक प्रस्ताव मागविल्याचे कळविले होते. त्यानंतर चंद्रपुरात टेक्सटाईल पार्क उभारण्याच्या कामाला वेग आला.
यासोबतच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे तयारी केल्याने पूर्वीप्रमाणेच ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनेच या परीक्षा घेण्यात याव्या. ताडोबा लगतच्या गावांमध्ये वाघांची दहशत मोठ्या प्रमाणात असून वर्षाकाठी ४०-५० बळी घेणाऱ्या वाघांचा तसेच शेतातील पिके नष्ट करणाऱ्या अन्य वन्य प्राण्यांचा बंदोबस्त त्वरित करावा, राज्य शासनाच्या विविध विभागांत रिक्त असलेल्या जागा भरण्यात याव्या, या मागण्या खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.