Prataprao Jadhav Sarkarnama
विदर्भ

Prataprao Jadhav Oath Ceremony : शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ.!

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेच्या शिंदे गटाला सात जागांवर विजय मिळाला आहे.

Chaitanya Machale

Prataprao Jadhav Oath Ceremony : बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात रविवारी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. या मतदारसंघातून जाधव हे तीनवेळा निवडूण आले आहेत. जाधव यांनी राज्यमंत्री म्हणून पाचव्या क्रमांकावर शपथ घेतली.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार जाधव यांच्या नावाचा समावेश आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेच्या शिंदे गटाला सात जागांवर विजय मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात एक राज्यमंत्रीपद शिंदे यांना देण्यात आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या विरोधात जाधव यांनी निवडणूक लढविली आणि विजयी झाले.

मोदी यांच्या मंत्रीमंडळात शिंदे गटाकडून कोणाला संधी दिली जाणार याबाबात मोठी उत्सुकता होती. यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा होती. बारणे यंदाच्या वर्षी सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून विजयी झाले आहे. तर जाधव हे चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे बारणे यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदार जाधव यांच्या नावाला पसंती दिली.

पंतप्रधान कार्यालयातून जाधव यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन आल्यानंतर ते दिल्लीत दाखल झाले. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी तीनवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT