ताडोबा टायगर सफारीच्या दरात तब्बल ₹1,000 ची वाढ केल्यामुळे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आधीच वाढलेल्या शुल्कावर आता शनिवार-रविवारसाठी अतिरिक्त दर लागू असून, पर्यटकांना 11,800 ऐवजी 12,800 रुपये मोजावे लागणार आहेत.
दरवाढ मागे घेतली नाही तर १ ऑक्टोबरपासून सफारीच्या सर्व प्रवेशद्वारांवर रास्ता रोकोसह आंदोलन होणार आहे.
Chandrapur, 26 September : ताडोबा टायगर जंगल सफारीवरून चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर चांगल्याच भडकल्या आहेत. सफारीच्या दरात तब्बल हजार रुपयाने वाढ करण्यात आल्याने त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला जाहे. सफारीच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर आंदोलन केले जाईल. कोणालाही जंगलात जाऊ दिले जाणार नाही. जोपर्यंत दरवाढ परत घेतली जाणार नाही; तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे या मुद्यावरून राजकारणही तापणार असल्याचे दिसून येते.
चंद्रपूर हा जंगल आणि वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ताडोबाची जंगल सफारी जगप्रसिद्ध आहे. देशविदेशातून पर्यटक येथे जंगल सफारीसाठी येतात. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांनीही ताडोबाच्या जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. हमखास वाघ बघायचा असेल तर ताडोबाला जाण्याचा सल्ला दिला जातो.
ताडोबा जंगल सफारीने स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ताडोबाची लोकप्रियता आणि पर्यटकांची पसंती बघून आता एक ऑक्टोबरपासून सफारीच्या दरात तब्बल हजार रुपयाने वाढ करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सफारीचे दर आधीच वाढवण्यात आले आहेत. यात शनिवार आणि रविवार या दोन दिवसांसाठी आणखी शुल्क वाढवण्यात आले आहेत. यापूर्वी ११ हजार ८०० रुपये सफारीसाठी मोजावे लागत होते. आता पर्यटकांना १२ हजार ८०० रुपये द्यावे लागणार आहे. त्यामुळे जंगल सफारीसह स्थानिक रोजगाराला याच मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर सफारीचे दर करण्यात आल्याने खासदार प्रतिभा धानोरकर चांगल्याच संतापल्या आहेत. ही दरवाढ तत्काळ मागे घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे. यानंतर वनविभागाने आपला निर्णय कायम ठेवल्यास एक ऑक्टोबरपासून या विरोधात आंदोलन केले जाईल. ताडोबा जंगलाचे सर्व प्रवेशद्वारावर विरोध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ताडोबा जंगल सफारीची दरवाढ जोपर्यंत मागे घेतली जाणार नाही; तोपर्यंत आपण शांत बसणार नाही. रास्ता रोको आंदोलन करून पर्यटकांना सफारी करू दिली जाणार नाही, या त्यांच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाची अडचण झाली आहे.
प्र: ताडोबा सफारीचे दर कितीने वाढवले आहेत?
उ: प्रत्येकी सुमारे ₹1,000 ने.
प्र: पूर्वी आणि आता सफारीसाठी किती शुल्क आहे?
उ: आधी ₹11,800 होते, आता ₹12,800 झाले आहे.
प्र: खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काय इशारा दिला आहे?
उ: दरवाढ मागे न घेतल्यास सर्व प्रवेशद्वारांवर आंदोलन आणि रास्ता रोको.
प्र: दरवाढीचा परिणाम कोणावर होऊ शकतो?
उ: पर्यटकांसह स्थानिक रोजगार आणि सफारी व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.