Ajit Pawar : आमची भावकी पालकमंत्रिपदाची स्वप्नं बघत होती; पण 'मी तुला पाडणार' असे त्याला सांगितले होते : अजितदादांचा हल्ला

Ashok Pawar News : शिरूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा माजी आमदार अशोक पवारांवर टोला लगावला. पालकमंत्रिपदाच्या स्वप्नांचा उल्लेख करत त्यांनी उपरोधक विधान करून स्थानिक राजकारणात खळबळ उडवली.
Ajit Pawar -Ashok Pawar
Ajit Pawar -Ashok PawarSarkarnama
Published on
Updated on
  1. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्यावर पुन्हा टीका करत त्यांच्या पालकमंत्रिपदाच्या स्वप्नांचा उल्लेख केला आणि पुढील निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचा इशारा दिला.

  2. अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचे जालिंदर कामठे, मुरलीधर निंबाळकर, रोहन सुरवसे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये प्रवेश केला.

  3. पवार यांनी पक्षनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करून, उमेदवारी फक्त निवडणुकीत जिंकण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांनाच दिली जाईल असे स्पष्ट केले.

Pune, 26 September : शिरूरमध्ये मला माझी भावकीच (माजी आमदार अशोक पवार) सोडून गेली. तो तर बिचारा पालकमंत्रिपदाची स्वप्नं बघत होता. त्याला वाटलं सगळीच अजितदादांसोबत गेलीत, आता आपण इकडं (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात) राहिलो तर आपलं सरकार येणार आणि आपणच पालकमंत्रिदी होणार. आपण सगळीकडे काम करणार, असे त्याला वाटत होतं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शिरूरचे माजी आमदार अशोक पवारांवर निशाणा साधला आहे.

भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे, भूविकास बॅंकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर, रोहन सुरवसे यांच्यासह अनेकांनी आज (२६ सप्टेंबर) अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्याबाबत पुन्हा एकदा भाष्य केले.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, प्रत्येकाचं स्वप्न, ध्येय असलं पाहिजे, यात दुमत नाही. पण, त्यानंतर मी त्याला सांगितलं होतं की, ठीक आहे, तू मला सोडून गेला आहे, त्यामुळे आता मी तुला पाडणार. तू कसा निवडून येतो, हे मी पाहणार.

नव्याने झालेल्या पक्षप्रेवशामुळे आता आपले कसे होणार, असा काही जणांना प्रश्न पडला असेल. पण, तिकिटाचा बिकिटाचा तसा काही विचार करू नका. ज्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल, त्यालाच आपण निवडणुकीत तिकिट देतो, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, आमदारकीच्या मागील निवडणुकीत शंकर मांडेकर हा आपलाच कार्यकर्ता पण काही कारणांमुळे त्याला दुसरीकडं जावं लागलं. काही कारणांमुळे त्याला जावं लागलं. खरं तर त्याला जायाचं नव्हतं. त्या खोलात मी आता जात नाही. पण, जिल्हा परिषदेचे तिकिट देऊन मीच त्याला निवडूनही आणलं होतं.

Ajit Pawar -Ashok Pawar
Dharashiv Collector Dance : धाराशिव कलेक्टरच्या डान्सबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील : योगेश कदमांनी थेटच सांगितले

विधानसभा निवडणुकीच्या वेळी मीच त्याला बोलावून घेतलं. आता आपल्याला भोर-मुळशी मतदारसंघासाठी उमेदवारी द्यायची आहे. रणजित शिवतरे, विक्रम खुटवड व इतर मान्यवरांनाही आपल्याला तिकिट मिळावं, असं वाटतं होतं. त्यांचाही तो अधिकारही होता. पण थोडं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं तर सीट येतंय का, हे पाहून आराखडे बांधले. मांडेकरच्या निवडणुकीत सर्वांनी काम केलं. त्यामुळे शंकर मांडेकर हा आमदार झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं, असेही पवारांनी नमूद केले.

ज्ञानेश्वर कटके, वैशाली नागवडे आणि मी मुंबईतील बंगल्याच्या लॉनवर बसलो होतो आणि ज्ञानेश्वर कटके याला तिकिट देण्याचा निर्णय झाला. त्यातून कटकेला उमेदवारी दिली. तो निवडून आला. मावळात सुनील शेळकेंनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. आपलेच जवळचे लोक अपक्ष म्हणून उभे राहिले आणि सर्वपक्षीय उमेदवार म्हणून पुढे आले. मला जरा काळजी होती. पण एक लाख मतांनी सुनील शेळके निवडून आले, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ज्यांच्यासेाबत राहायचं, त्यांच्यासोबत निष्ठेने राहा. दोन ते तीन डगरीवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला तर हातात काहीच राहत नाही. त्यामुळे निष्ठेला महत्व आहे. काम करताना ध्येयाला महत्व आहे.

Ajit Pawar -Ashok Pawar
Kamla Gavai RSS Event : सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमल गवई संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या मुख्य 'अतिथी'!
  1. प्र: अजित पवारांनी कोणावर टीका केली?
    उ: शिरूरचे माजी आमदार अशोक पवार.

  2. प्र: कोणकोणत्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला?
    उ: जालिंदर कामठे, मुरलीधर निंबाळकर, रोहन सुरवसे आणि इतर स्थानिक नेते.

  3. प्र: उमेदवारीबाबत अजित पवारांची काय भूमिका आहे?
    उ: जिंकण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांनाच तिकीट दिले जाईल.

  4. प्र: अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कोणता सल्ला दिला?
    उ: एकाच पक्षाशी निष्ठा ठेवून ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com