Ramdas Tadas, Bhushan Kardile, Charan Waghmare and Others Sarkarnama
विदर्भ

MP Ramdas Tadas : ...तर आरक्षणासाठी तेली समाजही रस्त्यावर उतरेल, रामदास तडस गरजले !

Atul Mehere

Nagpur Political Nedws : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सरकारवर दबाव वाढवत आहेत. त्यांना आरक्षण द्यावे, पण त्यासाठी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. चुकूनही असे झाल्यास ओबीसी आरक्षणासाठी तेली समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा भाजपचे वर्ध्याचे खासदार आणि प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस यांनी दिला. (They have started hunger strike again to create pressure on the government)

‘महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे’ची नागपूर विभागीय बैठक आज (ता. २८) नागपुरातील सिव्हिल लाइन्समधील जवाहर विद्यार्थी वसतिगृहात पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार तडस बोलत होते. ते म्हणाले, जरांगे पाटील ओबीसी समाजातून मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील यांच्या दबावातून सरकारने ओबीसी समाजावर अन्याय करणारा निर्णय घेऊ नये आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये. याबाबतचा प्रमुख ठराव या बैठकीत पारीत करण्यात आला. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास, ओबीसी समाजाच्या आंदोलनात तेली समाज रस्त्यावर उतरेल. त्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्यभर विभागवार बैठका घेत आहे. असे खासदार रामदास तडस म्हणाले.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, सरकारने जातिनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी, ओबीसी समाजाच्या आरक्षणात वाढ करावी आणि विधानसभा आणि लोकसभेत तेली समाजाला राजकीय प्रतिनिधी मिळावं हे पाच महत्वाचे ठराव आजच्या महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेत पारीत करण्यात आले.

जरांगे पाटलांच्या मागणीला आमचा विरोध आहे. ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या सर्वच जातींचा याला विरोध आहे. ओबीसीमध्ये तेली समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळेच जातिनिहाय जनगणना झाला पाहिजे, अशी आमचा मागणी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की राज्य सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. पण जरांगेंचा दबाव जास्त वाढू नये, याचीसुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्यभर विभागवार बैठका घेत आहे.

महाराष्ट्रात तेलघाणा महामंडळ स्थापन करण्याची आमची मागणी येत्या काळात आम्ही रेटून धरणार असल्याचेही खासदार तडस यावेळी म्हणाले. जातिनिहाय जनगणना झाल्यावर आमची टक्केवारी ६८ ते ६९ टक्क्यांपर्यंतही जाऊ शकते, असे भूषण कर्डीले यांनी सांगितले. आमच्या हक्कासाठी हा लढा असल्याचेही ते म्हणाले.

‘महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे’च्या नागपूर विभागीय बैठकीत संघटनेचे मार्गदर्शक गजानन शेलार, डॅा. भूषण कर्डिले, जगदीश वैद्य, नंदकिशोर दंडारे, माजी आमदार चरण वाघमारे, अतुल वांदिले, प्रकाश देवतळे, माधुरी तलमले, बळवंतराव मोरघडे, नयनी झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पूर्व विदर्भातील ‘महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे’च्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT