Nagpur News : नागपूर काँग्रेसला गटातटाचे राजकारण नवे नाही. एका नेत्याने एक म्हटलं की दुसरा नेता त्यापेक्षा वेगळच काही तरी बोलतो. परंतु हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावर काँग्रेसमधील दोन वरिष्ठ नेत्यांचे एकमत झालेलं दिसत आहे. उपराजधानी नागपुरात केवळ दहा दिवसांचं हिवाळी अधिवेशन घेण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पटोलेंच्या सुरात पहिल्यांदाच सूर मिसळत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही दहा दिवसांचे अधिवेशन म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला. (Vijay Wadettiwar's criticism of government over the ten-day assembly session)
भाजप हा दुतोंडी विषारी साप आहे. विदर्भावर अन्याय होत असल्याची ओरड भाजप करतो आणि आता स्वत:च केवळ दहा दिवसांचे अधिवेशन घेत आहे, याला काय अर्थ आहे. भाजप बूड नसणारा आणि भूमिका बदलणारा पक्ष आहे. जेव्हा मतांची गरज असते, तेव्हा यांना विदर्भप्रेम आठवतं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता अधिवेशन घेण्याची वेळ आली तेव्हा भित्र्यांसारखे पाठ दाखवून पळत आहेत. नागपुरातील हिवाळी अधिवेशन विदर्भातील प्रश्न निकाली काढण्यासाठी घेण्यात येते. त्यामुळे हे अधिवेशन किमान चार आठवडे चाललेच पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी राहील, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागपूरच्या भरवशावर राज्यातीलच नव्हे; तर देशातील राजकारण भाजप करतंय, हे राज्यकर्त्यांनी विसरता कामा नये. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दीड पट उत्पादनाचं गाजर दाखवलं. हमीभाव दीडपट दिल्याचा आव केंद्र सरकार आणतंय, अगदी त्याच पद्धतीने विदर्भातील अधिवेशन म्हणजे या प्रदेशातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. भाजपने या पापासाठी विदर्भातील जनतेची नाक घासून क्षमा मागितली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
केंद्र सरकारने शेती उत्पादनाचे नवे हमीभाव जाहीर केले. हे भाव शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. भाजपला वाटतं की, आपल्याला हिंदुत्व आणि राम एवढच तारू शकेल. मात्र, त्यांच्याकडून रामाचं नावं घेऊन रावणाचं काम केलं जातंय, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.