Sudhir Mungntiwar
Sudhir Mungntiwar Sarkarnama
विदर्भ

मुनगंटीवार म्हणाले, सत्ता मे जो आये है, जरा याद करो इनकी बेईमानी…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे, ही मागणी सभागृहात लावून धरताना माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात तुफान फटकेबाजी केली. त्यांनी एक कविता सादर करून शिवसेनेवर ताशेरे ओढले.

आमदार मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आदर महाराष्ट्रातील (Maharashtra) तमाम हिंदुत्ववादी बांधवांना आहे. काय त्यांच्या भाषणाची सुरुवात होती.. ‘माझ्या हिंदू बांधवांनो आणि मातांनो...’, अशी सुरुवात व्हायची आणि येवढेच नव्हे तर स्व. बाळासाहेब देवाच्या सिंहासनाच्या बाजूला बसून म्हणतील, ‘मैने तो सुना था बाप से बेटा सवाई, यहां तो आजोबा से नातू सवाई’ उद्या माझा मृत्यू झाला आणि मी तिरडीवर आहे आणि कुणी विचारले की, छत्रपती संभाजी महाराज मोठे होते की औरंगजेब, तर मी दोन-चार सेकंदांसाठी पुन्हा श्‍वास घेईन आणि सांगेन की छत्रपती संभाजी महाराजच (Chhatrapati Sambhaji Maharaj) मोठे होते. मग तुमचा त श्‍वास आहे, तुम्हाला काय झाले, असा सवाल त्यांनी औरंगाबादच्या नामकरणाबाबत शिवसेनेला उद्देशून केला. यानंतर त्यांनी खालील कविता सादर केली.

ए महाराष्ट्र के लोगो, जरा आंख मे भर लो पानी, सत्ता मे जो आये, उनकी जरा याद करो इनकी बेईमानी

जब चुनाव हुआ तब हमने, मिलकर की थी लडाई, विश्‍वास भरे दृष्टी से जनता ने जीत दिलाई..

तभी याद उन्हे वो आया, पिता के वचन की वानी, जरा याद करो इनकी बेईमानी..

बात असल थी निराली, बनना था उनको मुखीया अधर्म के झुठ कहानी का..

राग इन्होने गाया, जरा याद करो इनकी बेईमानी..

कॉंग्रेस तो कॉंग्रेस ही है, उनका क्या कहना..

झोल झपाटा खाली वादे, पाच साल तक सहना..

सत्ता के स्पर्धा मे भाई, वो थे चार नंबर, तुम्हारे साथ जोडतोड के चक्कर मे हो गई नय्या पार..

कभी दूर थे मिले अब बो बने दोस्त जानी, याद करो इनकी बेईमानी..

कधी कधी असं वाटतं की, सायबर हॅकींगनंतर काही लोकांनी आपला मेंदू तर हॅक नाही केला ना.. कारण आपल्या डोक्यात हिंदुत्वाचा विचार होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आदराचा विचार होता, माझं रक्त भगवं, माष हृदय भगवं, होता. मग माहिती नाही काय झालं? असं म्हणत त्यांनी ‘शिवसेनेचे लोक आम्हाला विचारतात की, पाच वर्ष तुम्ही काय केलं?’ या प्रश्‍नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १९८८ मध्ये त्यांचे २७ नगरसेवक निवडून आले होते. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेबांनी सांगितले होते की, औरंगाबादचे नाव मी संभाजीनगर करेन. त्यानंतर ते थांबले नाही, तर कृती केली. तेव्हा त्यांचे सरकार नव्हते. नंतर १९ जून १९९५ ला महापालिकेत ठराव झाला. कॉंग्रेसचे एक नगरसेवक मुस्ताक अहमद सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांचे प्रकरण दाखलच करून नाही घेतले. मग सरकार बदलले, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मतांसाठी गॅझेट नोटीफिकेशन मागे घेतल्याची आठवण आमदार मुनगंटीवार यांनी करवून दिली.

स्व. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे नसेल तर नका करू, ते आम्ही करू. पण आश्‍चर्य म्हणजे ४ मार्च २०२० ला तुम्ही केवळ दाखवायसाठी नवीन काम सुरू केले. तयारी सर्व केली. पण पुढे काहीच केले नाही. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जेव्हा भाष्य केले, तेव्हा मी त्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की तुम्ही औरंगाबदचे नामकरण करीत असाल, तर तुमची उंची हिमालयापेक्षाही मोठी होईल आणि बाळासाहेब तेथे बसूनही म्हणतील की, आजोबा से नातू सवाई, असे त्यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT