Sunil Divare Sarkarnama
विदर्भ

यवतमाळ बाजार समितीच्या शिवसेना संचालकाचा गोळ्या झाडून खून

या घटनेनंतर शिवसैनिकांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली असून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारनामा ब्यूरो

यवतमाळ : यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिवसेनेचे (shivsena) संचालक सुनील डिवरे यांची आज (ता. ३ फेब्रुवारी) गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली असून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना नेत्याच्या खुनामुळे जिल्ह्यात एकच खळबड उडाली आहे. (Murder of Shiv Sena director of Yavatmal market committee)

ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील भांब राजा गावात आज घडली आहे. भांब राजा गावात २ ते ३ अज्ञात तरुणांनी सुनील डिवरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले आहेत. ही बातमी यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात शिवसैनिकांनी एकच गर्दी केली आहे.

या घटनेनंतर संतप्त जमावाकडून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांनी जादा कुमक मागवून जमावाला वेळीच नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सुनील डिवरे भांब राजा या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होते. यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिवसेनेचे मोठे नेते म्हणून सुनील डिवरे यांची ओळख होती. यवतमाळ जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक लढवण्यासाठी डिवरे हे इच्छूक होते. त्याअगोदरच त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT