Nagpur News : भाजपची सदस्य मोहीम सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला एक लाख सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले आहे. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भात येऊन धुरळा उडवून दिला. उबाठा, मनसे, काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थोडे थोडके नव्हे, तर तब्बल 150 मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी प्रवेश घेतला. ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
मुस्लिम समाज ही काँग्रेसची (Congress) गठ्ठा व्होट बँक समजल्या जाते. काँग्रेस वगळता बोटावर मोजण्या इतपत मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते इतर पक्षात आहे. भाजप आणि मोदींच्या हिंदुत्वादी धोरणामुळे मुस्लिम समाज धास्तावला आहे. यातूनच लोकसभेच्या निवडणुकीत हा समाज ताकदीने काँग्रेसच्या सोबत उभा असलेला दिसला.
महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलणार हा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे मुस्लिम आणि अनुसूचित जातीची मते महाविकास आघाडीच्या पारड्यात गेली होती. पर्याय नसल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सेनेलाही मतदान केले होते. मात्र उबाठाचे मुस्लिम प्रेम सत्तेसाठी असल्याचे त्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले. त्यामुळे मुस्लिमांच्या भावना आता बदलत असल्याचे दिसून येते.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळाले. काँग्रेसचे जवळपास पानिपत झाले आहे. शंभर जागा लढून फक्त सोळा आमदार निवडूण आले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मुस्लिम समाजाला प्रतनिधित्व दिले नव्हते. विधान परिषदेच्यावेळीसुद्धा विचार केला नव्हता. विधानसभेत याची भरपाई केली जाईल अशी आशा त्यांना वाटत होती.
नागपूरमध्ये मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ मुस्लिबहूल आहे. अनिस अहमद या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते. असे असतानाही विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात आली नाही. हे बघता आता मुस्लिमांनी राष्ट्रवादीला काँग्रेसचा पर्याय म्हणून निवडल्याचे दिसते. महाविकास आघाडीचे भवितव्य कोणालाच दिसत नाही. भाजप आणि शिवसेना हिंदुत्ववादी संघटना आहे. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी मुस्लिम समाजाला जवळची वाटत असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. महायुतीत सहभागी झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा कायम ठेवली आहे. सत्तेसोबत राहून समाजाच्या विकाससाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची भावना मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात बजाजनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय कार्यालयात शुक्रवारी दीडशे मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.