Pune MVA Sarkarnama
विदर्भ

MVA News : महाविकास आघाडीत एका-एका जागेसाठी रस्सीखेच; भाकपने मागितल्या 15 जागा

Political News : भाकपने प्रस्ताव दिलेल्या मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि यवतमाळमधील वणी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : महाविकास आघाडीत विधानसभेच्या एका-एका जागेसाठी रस्सीखेच सुरू असताना आता भारतीय कम्युनिस्ट कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आघाडीकडे 15 जागांची मागणी केली आहे. आघाडी यापैकी किती जागांवर तडजोड करते त्यावरच भाकपचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. भाकपने प्रस्ताव दिलेल्या मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि यवतमाळमधील वणी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

हिंगणा आणि वणी या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपचे (BJP) आमदार आहेत. हिंगणा राष्ट्रवादी तर वणी मतदारसंघ काँग्रेसकडे (Congress) आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. हा मतदारसंघ काँग्रेसलासुद्धा हवा आहे. असे असताना त्यावर आता भाकपने बोट ठेवल्याने मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (MVA News)

हिंगण्यात भाजपचे समीर मेघे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी नेते व माजी मंत्री रमेश बंग आणि विजय घोडमारे यांचा पराभव केला आहे. आता काँग्रेसने मेघे यांच्या पराभवासाठी ताकदीने येथे उतरण्याचा निर्णय घेतला आहे. रमेश बंग स्वतः पुन्हा तयारीला लागले आहेत.

राज्याचे माजी मंत्री सुनील केदार येथे आपल्या समर्थकाला उभे करण्यासाठी आग्रही आहेत. गरज भासल्यास पक्षांतर करून राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हावर काँग्रेसचा उमेदवार येथे उभा राहू शकतो. यात आता भाकपने उडी घेतली आहे.

भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत नागपूरमध्ये घेण्यात आली. पक्षाचे महासचिव डी. राजा आणि राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी महाराष्ट्रात आम्ही 15 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे दिला असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना केंद्र सरकारने करावी यासाठी राज्यभर आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने केले जात आहे. जो पर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव करण्यासाठी भाकपचा निर्धार असल्याचे यावेळी भालचंद्र कांगो यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT