Chhagan Bhujbal : मोठी बातमी ! छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली; एअर ॲम्ब्युलन्सनने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

political News : पुण्याहून वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सनने मुंबईला हलविण्यात आले. त्यांच्यावर तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची गुरुवारी सायंकाळी प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त ते पुण्याला आले होते.

त्यामुळे त्यांना पुण्याहून वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सनने मुंबईला हलविण्यात आले. त्यांच्यावर तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना गुरुवारी सकाळपासून अस्वस्थ वाटू लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा नियोजित दौरा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महात्मा फुले यांच्या भिडे वाडा स्मारकाला भेट देणार होते. त्यामुळे मंत्री भुजबळ पुण्यात उपस्थित होते.

सकाळपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होते. दुपारनंतर त्यांना ताप वाढला घशाचे इन्फेक्शन झाल्याचा संशय होता. त्यांना बोलण्यासाठी देखील त्रास होत होता. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सनने मुंबईला हलविण्यात आले.

Chhagan Bhujbal
Mahayuti News : महायुतीमध्ये 'त्या' 39 जागा कोणाच्या वाट्याला येणार ? शिवसेना, राष्ट्रवादीने लावली ताकद

मंत्री भुजबळ यांना गुरुवारी दुपारी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टर उपचार करीत असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Chhagan Bhujbal
Sanjay Raut : मोठी बातमी : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; कोर्टाने ठोठावली शिक्षा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com