Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporation Sarkarnama
विदर्भ

Nagpur : ...आणि म्हणून महानगरपालिकेच्या थकित ७०० कोटी मिळण्याच्या आशा उंचावल्या !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Municipal Corporation News : महापालिकेचा मलेरिया, फायलेरिया विभागांच्या वेतनाचा तीन वर्षांपासून निधी राज्य सरकारकडे अडकला आहे. याशिवाय सिमेंट रस्त्यांचे अनुदान तसेच विविध उपक्रमांतील अनुदान, असे एकूण सातशे कोटी रुपये महापालिकेचे राज्य सरकारकडे थकीत आहेत. पण आता हा निधी मिळण्याच्या महानगरपालिकेच्या आशा उंचावल्या आहेत.

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात नागपूरला भरभरून दिले. विशेष म्हणजे महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र व महानगरपालिकेच्या शाळांतील आठवीपर्यंतच्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. त्यामुळे आता राज्य शासनाकडे थकीत असलेले जवळपास सातशे कोटी रुपयेसुद्धा मिळतील, असे महानगरपालिका प्रशासनाला वाटू लागले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात नागपूरच्या क्रीडा संकुलाला १०० कोटी, आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्रासाठी २२८ कोटींची घोषणा केली. संत्रा प्रक्रिया केंद्रासाठी घोषित केलेल्या २० पैकी १० कोटी नागपूरला मिळणे अपेक्षित आहेत. मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी, विदर्भ साहित्य संघाला १०० कोटी, श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरीला ६ कोटी रुपयांची घोषणा केली. एकूणच नागपुरातील विविध संस्थांना कोट्यवधी रुपयांची घोषणा केल्याने महापालिकेच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत.

सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेची सध्या तरी कसरत होत आहे. महापालिकेचे उत्पन्न व खर्चाचा गोषवारा बघितल्यास राज्य सरकारच्या जीएसटी व इतर अनुदानातून महापालिकेचा कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. महापालिकेचा मलेरिया, फायलेरिया विभागाच्या वेतनाचा तीन वर्षांपासून निधी राज्य सरकारकडे (State Government) अडकला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरला भरपूर दिल्याने महापालिकेला ही थकीत रक्कम मिळण्याचा विश्वास वाटत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विशेष म्हणजे काल नागपूर (Nagpur) मनपा आयुक्तही (Municipal Commissioner) मुंबईला होते. यासंबंधात त्यांची चर्चा झाली असल्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. महापालिकेला ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाची घोषणा करून उपमुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या एका खर्चाला हातभार लावल्याची चर्चा अधिकाऱ्यांत रंगली आहे.

महापालिकेला अंशतः दिलासा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्याची घोषणा तसेच महापालिका (Municipal Corporation) क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र जाहीर केले. याशिवाय श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरीसाठी ६ कोटी रुपये देण्याचीही घोषणा केली. त्यामुळे यावर प्रस्तावित महापालिकेचा खर्चाचा भार कमी झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT