Nagpur : देवेंद्र फडणवीस वित्तमंत्री असल्याचा नागपूरला झाला ‘हा’ मोठा फायदा !

Fadanvis : आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच येवढी मोठी वाढ करण्यात आली आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

DCM Devendra Fadanvis News : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये गृह आणि वित्त ही महत्वाची खाती फडणवीसांनी स्वतःकडे ठेवली. ते वित्तमंत्री असल्याचा नागपूरला चांगलाच फायदा झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूर जिल्ह्याला यंदा भरघोस निधी मिळाला आहे.

या आर्थिक वर्षाच्या (वर्ष २०२२-२३) तुलनेत पुढील आर्थिक वर्षाच्या (वर्ष २०२३-२४) निधीत तब्बल ९५ कोटींची वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच येवढी मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे शहरी भागाच्या विकासासाठी ७९ कोटींचा निधी देण्यात आला. राज्याचे वित्तमंत्री नागपूरचे असल्याचा चांगलाच फायदा झाला आहे.

वर्ष २०२३-२४ साठी डीपीसीच्या माध्यमातून ९९८ कोटींची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी जिल्ह्यासाठी ८०० कोटींचा निधी मंजूर केला. यात डीपीसीला ७२०.५० कोटींचा निधी मंजूर झाला. तर शहरी भागाच्या विकासासाठी ७९ कोटींचा निधी देण्यात आला.

वर्ष २०२२-२३ साठी तत्कालीन वित्त मंत्री अजित पवार यांनी ६२५ कोटींचा निधी डीपीसीला तर शहरी भागासाठी ५३ कोटींचा निधी दिला होता. प्रथम शहरी भागाच्या विकासासाठी अतिरिक्त निधी डीपीसीला देण्यात आला होता. डीपीसीतून निधी मिळत नसल्याने शहरासाठी वेगळी डीपीसी करण्याची मागणी अनेकदा सदस्यांनी बैठकीत केली होती. त्यामुळेच माजी वित्त मंत्री अजित पवार यांनी हा निधी दिला होता.

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis; नेतृत्व डोक्यात गेले तर आपली काँग्रेस होईल!

हा निधी विद्यमान वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही कायम ठेवत त्यात २६ कोटींची वाढ केली. पहिल्यांदाच डीपीसीच्या निधीत ९५ कोटींपर्यंत वाढ मिळाली. आतापर्यंत साधारणतः ५० ते ७५ कोटींचीच वाढ मिळत असे. नावीन्यपूर्ण योजना, मुख्यमंत्री रस्ते व आरोग्य विभागाला यंदा भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात बैठक..

डीपीसीच्या निधीवर अप्रत्यक्षपणे स्थगिती आहे. निधी वितरणात विद्यमान नागपूरच्या (Nagpur) पालकमंत्र्यांकडून (Guardian Minister) बदल करण्यात येणार आहे. लघू गटाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. परंतु अंतिम शिक्कामोर्तब बाकी आहे. पुनर्नियोजनाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. पालकमंत्री फडणवीस यांच्या वेळेच्या अभावी बैठक झाली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com