Sanket Bawankule Car Sarkarnama
विदर्भ

Nagpur Audi Accident: ...म्हणून संकेत बावनकुळेंवर कारवाई नाही!

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule News: नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे.

या प्रकरणातील आरोपी ऑडी कार ड्रायव्हरच्या शरीरात अल्कोहोल असल्याचे फॉरेन्सिक लॅबचा चाचणीत स्पष्ट झाले आहे. ड्रायव्हर अर्जुन हावरे याच्या रक्तात 28 मिलिग्राम, रोनीत चिंतमवार याच्या रक्तात 25 मिलिग्राम अल्कोहोलचे प्रमाण मिळून आल्याचे चाचणीत आढळले आहे.

कायद्यानुसार ठरवून दिलेल्या मर्यादेत दोघांच्याही शरीरात अल्कोहोलचे प्रमाण आढळले आहे. नियमानुसार 30 मिलिग्राम/100 ml अल्कोहोल एवढी मर्यादा आहे. अपघात झाल्यानंतर 7 तासानंतर दोघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते.

लवकरात लवकर त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले असते तर शरीरातील मद्याचे प्रमाण अधिक आढळले असते, त्यांच्यावर कारवाई झाली असती. दोघांच्या रक्तात आढळलेले अकोहोलचे प्रमाण कमी आढळल्याने मोटार वाहन कायद्यानुसार संकेत बावनकुळे यांच्यावर सध्यातरी कुठलीच कारवाई होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संकेत बावनकुळेंमुळे त्यांचे वडील चंद्रशेखर बावनकुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नागपुरमध्ये ज्या ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली, त्या गाडीत संकेत बावकुळे असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी संकेत बावनकुळेंनी बीफ खाल्ल्याचा दावा केला आहे. त्यांनी लाहोरी बार बिलाचा हवाला देत हा दावा केला होता. मात्र हा दावा लाहोरी बारचे मालक समीर शर्मा यांनी फेटाळून लावला आहे. त्यांनी राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT