Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना 'मातोश्री'वर मिळणार पोहरादेवीचा दोन लाखांचा 'प्रसाद'

High Court Scrap Petition Against Uddhav Thackeray Poharadevi: मंहंतांनी दिलेली विभूती उद्धव ठाकरे यांनी लावली नाही, त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, असा युक्तिवाद याचिकेत केला होता.
High Court Scrap Petition Against Uddhav Thackeray Poharadevi
Uddhav Thackeray PoharadeviSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी डॉ.मोहन चव्हाण यांनी न्यायालयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाचा अपमान करून पोहरादेवीचा प्रसाद खाल्ला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायालयाने डॉ. मोहन चव्हाण यांच्या विरोधात निकाल दिला आहे.

मोहन चव्हाण यांना न्यायालयाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. हे दोन लाख रुपये उद्धव ठाकरे यांना देण्याचे आदेश न्यायालयाने डॉ. मोहन चव्हाण यांना दिले आहेत. याचिकेवर सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने दोन लाखांचा डीडी मातोश्रीवर नेऊन द्या, असा आदेश दिला आहे.

डॉ. मोहन चव्हाण हे 18 सप्टेंबर रोजी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना देणार 2 लाखांचा डीडी देणार आहेत.कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला म्हणून न्यायालयाने चव्हाण यांना हा दंड ठोठावला आहे.

मंहंतांनी दिलेली विभूती उद्धव ठाकरे यांनी लावली नाही, त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, असा युक्तिवाद याचिकेत केला होता. याचिकेवर न्यायमूर्ती एस.जी. मेहरे यांच्या एकल खंडपीठाने २९ ऑगस्ट रोजी यासंदर्भात आदेश दिला होता.

High Court Scrap Petition Against Uddhav Thackeray Poharadevi
Sharad Pawar: मुंबईतील 7 जागांसाठी शरद पवार गट आग्रही; वरिष्ठ नेत्यांमध्ये बोलणी सुरु

कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीच्या देखील लक्षात येईल की, कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करणे किंवा न्यायालयीन व्यवस्थेचा वापर करणे, असे दाखल झालेल्या याचिकेतून दिसून येतंय. अशा याचिकांमुळे समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींची प्रतिमा मलिन होत असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. अनेकदा वाईट हेतूने अशा याचिका दाखल केल्या जातात. ठाकरे यांच्यावरील आरोपांना मुळातच आधार नसल्याचं न्यायालयाने नमूद केलंय.

‘१९ सप्टेंबरपर्यंत ठाकरे यांना स्वत: व्यक्तिश: भेटून त्यांच्या हातात किंवा त्यांनी सांगितलेल्या व्यक्तीकडे दोन लाखांचा डिमांड ड्राफ्ट द्या’, असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चव्हाण यांना दिला आहे.

काय प्रकरण आहे?

पोहरादेवी ट्रस्टचे महंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री बंगल्यावर गेले होते. त्यावेळी महंतांनी त्यांना प्रसाद दिला आणि पवित्र अस्थी (विभूती) दिली. ते ठाकरे यांनी स्वीकारले.

त्यांनी प्रसाद त्वरित खाल्ला नाही आणि तो सहकाऱ्याकडे दिला. विभुतीही घेऊन सहकाऱ्याकडे दिली आणि हात झटकला. या साऱ्या घटनेचे चित्रिकरण एका वृत्तवाहिनीवर त्या दिवशी झळकली होते.

ठाकरे यांची ती कृती आमच्या बंजारा समुदायाचे दैवत असलेल्या पोहरादेवीचा अपमान आहे. तसेच त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत’, असा दावा करत चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी नांदेडमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी संहिता प्रक्रियेच्रूा कलम १५६(३) अन्वये तक्रार दाखल केली होती. ‘विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस माझ्या तक्रारीची दखल घेत नसल्याने त्यांना ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश द्यावा’, अशी विनंती त्यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com