BJP Sarkarnama
विदर्भ

BJP Politics : नगरपरिषदेत गोंधळ तरीही महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला युती नको...

Nagpur Municipal Election : मागील महापालिकेच्या निवडणुकीत १५० पैकी भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचे २९ तर शिवसेना दोन, राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आला होता. महायुती झाल्यास अजित दादांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेसाठी जागा सोडाव्या लागतील.

Rajesh Charpe

Nagpur News, 03 Dec : नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती वेगवेगळी लढली. कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी टाळावी यासाठी स्वबळावर लढत असल्याचा दावा भाजपने केला होता.

मात्र उलटेच झाले. बंडखोरी टाळण्याऐवजी अधिकच वाढली. गोंधळही वाढला. कार्यकर्ते आपसात भिडले. हे बघता आता महापालिकेची निवडणूक एकत्र लढू असे भाजपच्या नेत्यांमार्फत सांगितले जात आहे. मात्र भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी भाजपने स्वतंत्रपणे लढावे अशी मागणी पक्षाकडे केली आहे.

आमदार खोपडे पूर्व नागपूरमधून सलग ४ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. यावेळी त्यांनी सर्वाधिक एक लाखांचे मताधिक्य घेतले आहे. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाला त्यांनी भाजपचा बालेकिल्ला बनवला आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या पूर्व नागपूर मतदारसंघाने भाजपला सर्वाधिक २२ नगरसेवक दिले होते.

त्यामुळे त्यांना महायुती नको आहे. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना निवडणूक लढवली होती. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव व महिला आयोगाच्या माजी सदस्य आभा पांडे यांनी बंडखोरी केली होती. आता पेठे आणि पांडे महापालिकेची निवडणूक लढणार आहे.

महायुती झाल्यास पांडे यांच्यासाठी जागा सोडावी लागले आणि आमदार खोपडे यांना प्रचारही करावा लागणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पेठे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव निवडून येणारे नगरसेवक होते. त्यांच्या प्रभागातून ३ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. हे सर्व राजकीय समीकरणे बघता आमदाराला महापालिकेच्या निवडणुकीत महायुती नको आहे.

मागील महापालिकेच्या निवडणुकीत १५० पैकी भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचे २९ तर शिवसेना दोन, राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आला होता. महायुती झाल्यास अजित दादांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेसाठी जागा सोडाव्या लागतील. याचा भाजपला कमी व मित्रपक्षाला अधिक होणार आहे. उद्या तेच शिरजोर होतील हेसुद्धा स्वबळावर लढण्याचे कारण भाजपच्यावतीने पुढे केले जात आहे.

आमदार खोपडे यांच्या माध्यमातून भाजपने स्वबळाचा खडा टाकला असल्याचे बोलले जात आहे. जागा वाटपावरून शेवटपर्यंत ताणून ठेवायचे आणि शेवटच्या टप्प्यात युती तोडायची असे धोरण भाजप राबवणार असल्याची शंका राष्ट्रवादीला आहे. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे हेच धोरणे ठेवले. एकत्र लढू असे सांगितले आणि सर्वांना गाफील ठेवले. नगरपालिकेच्या निकालावरही महायुतीचे बरेच काही अवलंबून राहणार असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT