Girish Vyas And CM Fadnavis  Sarkarnama
विदर्भ

BJP News: मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भाजपला मोठा धक्का, निवडणुकीच्या तोंडावरच बड्या नेत्यानं तडकाफडकी पक्ष सोडला, बंडखोर उमेदवाराला जाहीर पाठिंबा

BJP Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये पदवीधर मतदारसंघात महायुतीत बंडाचं निशाण फडकवलं गेलं आहे. तर महाविकास आघाडीलाही बंडखोरी शमविण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे युती आणि आघाडीत बंडखोरी झाल्यानं टेन्शन वाढलं आहे.

Deepak Kulkarni

Nagpur News: राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरसाठीच्या पाच जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (ता.9) अंतिम दिवस होता. आता अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत संपल्यानंतर निवडणुकांच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपला महायुतीतील तीन ठिकाणची बंडखोरी रोखण्यात यश आलं. मात्र, दुसरीकडे विदर्भात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गिरीश व्यास यांनी शुक्रवारी (ता.9) भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नागपूर पदवीधरची निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं असतानाच व्यास यांनी राजीनाम्याचा बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली आहे.

गिरीष व्यास हे जनसंघाचे माजी अध्यक्ष बच्छराज व्यास यांचे नातू आहेत.त्यांनी विधान परिषदेचे माजी आमदार राहिले आहेत.ते नागपूर महापालिकेचे माजी नगरसेवकही राहिले आहेत. तसेच त्यांनी भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेल्या गिरीश व्यास यांनी तडकाफडकी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुकीत महायुतीतील बंडखोरी रोखण्यासाठी कंबर कसली असतानाच भाजप नेते गिरीष व्यास यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे व्यास यांनी राजीनामा देतानाच दुसरीकडे भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.त्याही पुढची अपडेट म्हणजे गिरीश व्यास यांच्या महाल परिसरातील कार्यालयातच बंडखोर उमेदवार प्रा.अनिल सोले यांचं मुख्य प्रचार कार्यालयही थाटण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये पदवीधर मतदारसंघात महायुतीत बंडाचं निशाण फडकवलं गेलं आहे. तर महाविकास आघाडीलाही बंडखोरी शमविण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे युती आणि आघाडीत बंडखोरी झाल्यानं टेन्शन वाढलं आहे.

भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्याविरोधात माजी आमदार अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार व आमदार अभिजीत वंजारी यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नितेश कराळे यांनी बंड केले आहे. त्यामुळे या ठिकाणाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT