

Mumbai News : विरोधी पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि SIR रद्द करणे हे दोन विषय अजेंड्यावर घेतले आहेत. त्यामुळे दिल्लीतील वातावरण तापले आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेससह इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. त्यातच काँग्रेसने दोन दिवसापासून केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारची कोंडी झाली आहे. त्यातच आता घटक पक्ष नाराज होऊ नये आणि त्यांचेही पाठबळ मिळावे यासाठी राहुल गांधी यांनी पुढील रणनीती ठरवल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, ममता दीदी आणि इतर घटक पक्षातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला आहे.
गेल्या चार दिवसापासून दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलन करीत केंद्र सरकारची कोंडी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेससह इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. राहुल गांधी, काँग्रेसने निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन तापले आहे. हे आंदोलन किती दिवस चालेल याची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आंदोलन संसदेच्या आसपास सुरू आहे. आम्हाला आंदोलनासाठी एक जागा द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
त्यातच अचानक आंदोलन लांबल्यामुळे घटक पक्ष संभ्रमात पडले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी इंडिया आघाडीची ताकद दिसली. 19 घटक पक्षाचे खासदार रस्त्यावर उतरले. पण नंतरच्या आंदोलनात काँग्रेसचे नेते आणि खासदार आघाडीवर दिसत आहेत. हॉटेलमधील डिनर डिप्लोमसीही समोर आली.
शुक्रवारी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. आंदोलनाची दिशा काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातच आता घटक पक्ष नाराज होऊ नये आणि त्यांचेही पाठबळ मिळावे यासाठी राहुल गांधी यांनी पुढील रणनीती ठरवल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, ममता दीदी आणि इतर घटक पक्षातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधल्याचे मानले जात आहे. यावेळी या नेत्याशी संपर्क साधून त्यांनी येत्या काळात मोदी सरकारविरोधातील आंदोलनाची रणनीती ठरवली आहे.
राष्ट्रपतींची आज भेट घेणार?
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे खासदार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रपती भवनाकडून इंडिया आघाडीच्या 10 सदस्यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्यात आली आहे. या भेटीत विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली जाण्याची शक्यतही वर्तवली जात आहे. तसेच एसआयआर प्रक्रियेबाबतचे आक्षेप मांडण्यात येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.