BSP Party Sarkarnama
विदर्भ

BSP Party Maharashtra : 'बसपा'च्या जिल्हाध्यक्षांवर ठेवणार प्रभारी निगराणी

BSP Party Maharashtra meeting Nagpur hinting significant organizational changes : कांशीराम यांच्या जयंतीनिमित्ताने नागपूरमध्ये बसपची महाराष्ट्र राज्यातील 30 जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत घेऊन संघटनेत फेरबदल संकेत दिले आहे.

Rajesh Charpe

Nagpur Politics : लोकसभेच्या निवडणुकीत सातत्याने येत असलेले अपशय आणि त्या पाठोपाठ विधानसभेतही मतांचा टक्का घसरत चालला असल्याने बसपाने संघटनेत मोठे ऑपरेशन केले आहे.

आता महापालिकेच्या निवडणुकीत आपले 10 नगरसेवक टिकावेत याकरिता बसपाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समित्या तयार करण्यासोबतच चार प्रभारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच जिल्हा प्रमुखांवरसुद्धा निगराणी ठेवली जाणार आहे.

बसपाने (BSP) पक्षाचा मतांचा टक्का वाढावा, यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत आयात उमेदवारांवरच यापूर्वी भर दिला होता. मात्र निवडणूक आटोपल्यानंतरह एकही उमेदवार पक्षात कायम राहिला नाही. यावेळी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाने प्रथमच आपल्या कार्यकर्त्याला मैदानात उतरवले होते. या प्रयोगसुद्धा फसला आहे. सोबतच मतांचा टक्काही घसरला आहे. ही बसपाच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा मानल्या जाते.

बसपाला अद्याप महाराष्ट्रात (Maharashtra) खाते उघडता आले नाही. अनेक पदाधिकाऱ्यांना यापूर्वीच पक्षाने घरचा रस्ता दाखवला आहे. वारंवार निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्या मायावती यांच्या सहमतीनेच संघटनेचा विस्तार केला जाणार आहे. 15 मार्चला नागपूरमध्ये कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या 30 जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांच्या संमेलनानंतर जिल्हास्तरवरील संघटनेची बांधणी केली जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनीती नागपूरमधून आखली जाणार आहे. बसपाचे पॅकेट लक्षात घेऊन त्यानुसार उमेदवार उभे केले जाणार आहेत. याकरिता निवडणुकीचा डेटा तयार करण्यात आला आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी 52 मतदारसंघात बसपाची राजकीय स्थिती चांगली असल्याचा अहवाल सांगतो. येथील उमेदवार पराभूत झाले असले तरी मतेच चांगली मिळाली आहे. अनेक उमेदवार तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. अनेक मतदारसंघात आपसातील मतभेद, गटबाजीचा फटका बसला असल्याचे निदर्शनास आले आहे.

2017च्या निवडणुकीत नागपूर महापालिकेते 151 पैकी 10 नगरसेवक बसपाचे निवडून आले होते. संख्याबळाचा विचार करता बसपा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. अमरावती महापालिकेत सहा, तसेच वाडी आठ, कामठी दोन, गोंदिया चार, चंद्रपूर आठ, वर्धा नऊ तसेच यवतमाळ येथे बसापचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. दोन मोठ्या निवडणुकीत पराभव झाला असल्याने बसपाला आता पुन्हा महापालिका, जिल्हा परिषद, तसचे नगर पालिकेपासून नव्याने सुरवात करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT