Sharad Pawar on Beed : शरद पवारांचं 'बीड'बाबत मोठं निरीक्षण; राजीनामा दिल्यानंतरही 'टार्गेट'वर पुन्हा एकदा धनंजय मुंडे?

NCP Sharad Pawar Maharashtra Mahayuti government strict action law and order situation Beed : बीडमध्ये बिघडलेल्या शांतता सुव्यवस्थेवर राज्यातील महायुती सरकारने कठोर भूमिका घ्यावी अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
Sharad Pawar .jpg
Sharad Pawar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed unrest latest news : बीड जिल्ह्यात बिघडलेल्या शांतता-सु्व्यवस्थेवरून शरद पवार यांनी गंभीर निरीक्षण नोंदवले आहे.

'गेल्या काही दिवसांत काहींनी सत्तेचा गैरवापर केला. त्याचेच दुष्परिणाम बीड जिल्ह्यात उमटत आहे', असा शरद पवार यांनी म्हटले. शरद पवार यांनी हे निरीक्षण नोंदवताना कोणाचाही उल्लेख केला नाही. पण धनंजय मुंडे यांच्या सत्ता काळाकडे त्यांच्या निरीक्षणाचा हा रोख होता.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "बीड जिल्ह्याची जी आज अवस्था आहे, ती कधीही नव्हती. बीड जिल्हा सर्वसमावेश असल्याचा माझा अनुभव आहे. माझे सहा-सहा सदस्य आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. सामंजस्याचे वातावरण होते. पण काही लोकांनी सत्तेचा गैरवापर सुरू केला. त्याचेच दुष्परिणाम बीड जिल्ह्यात उमटल्याचे दिसतात".

Sharad Pawar .jpg
Defense secrets leaked : पाकिस्तान एजंट 'नेहा'च्या जाळ्यात अडकला, देशाची संवेदनशील माहिती देऊन बसला; शस्त्रनिर्मिती कारखान्यातील विभागप्रमुखाला अटक

'राज्य सरकारने कोण आहे, याचा विचार न करता, कायदा हातात घेणारे, वातावरण खराब करणारे, अशांच्या संबंध सक्त धोरण आखण्याची गरज आहे. बीड (BEED) जिल्ह्यात चांगले दिवस कसे येतील, याची काळजी घ्यावी", असेही शरद पवार यांनी म्हटले.

Sharad Pawar .jpg
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणी संपेनात! आमदारकीही धोक्यात? आजच होणार फैसला!

पवारांनी देशमुख कुटुंबियांची घेतली होती भेट

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सर्वात अगोदर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणारे शरद पवार होते. याशिवाय परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची देखील त्यांनी भेट घेतली होती. बीडमधील संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेचे गांभीर्य सांगितले होते. मुख्यमंत्री फडणवीस यानंतर बीडमधील घटनेत 'अ‍ॅक्शन मोड'वर आले.

दमानियांचा राजकीय गुन्हेगारीविरुद्ध लढा

संतोष देशमुख यांची मानव जातीला काळीमा फासेल, अशी क्रूरपणे हत्या झाली. या घटनेला तीन महिने झालेत. परंतु बीड जिल्ह्यातील या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील राजकीय गुंडागर्दीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यावरून बीडमध्ये कायदा आहे की नाही, अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह बीडमधील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या घटनेत सातत्याने पाठपुरावा करत असल्याने त्यातील राजकीय गुन्हेगारी समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com