The present situation of toilets also became a problem : जी-२० परिषदेसाठी उपराजधानी नववधूप्रमाणे सजवली जात आहे. या सजावटीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. पण मूलभूत सुविधांकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. केवळ दिखाऊपणाची कामे केली जात आहेत. पण सुविधांच्या नावावर बोंब आहे.
शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहे अपुरी आहेत. सध्यस्थितीतील स्वच्छतागृहांचीही दुर्दशा झाली असून महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी काल ‘राईट टू पी’साठी आंदोलन केले.
महिलांसाठी स्वच्छतागृहे तत्काळ न बांधल्यास जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांपुढे अस्वच्छ व दुर्दशा झालेल्या स्वच्छतागृहाचे फोटो प्रदर्शित करून मनपाची पोलखोल करणार, असा इशारा नागपूर सिटीझन्स फोरमने दिला.
शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह पुरेसे नसल्याने काल नागपुरातील (Nagpur) व्हेरायटी चौकात सिटीझन्स फोरमने आंदोलन केले. या आंदोलनात शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या, महाविद्यालयीन युवती, नोकरदार महिला व विविध बाजारपेठांमध्ये काम करणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या.
महिलांनी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहांसाठी फलक हाती घेऊन महानगर पालिका व लोकप्रतिनिधींविरोधात घोषणा देत रोष प्रकट केला. गेल्या वर्षभरापासून नागपूर सिटिझन्स फोरमने ‘राईट टू पी’ हे अभियान हाती घेतले आहे.
या अभियानांतर्गत जनजागृती, स्वच्छतागृहाची तपासणी व जनमत संग्रह असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थिनी, नोकरदार महिला, ऑटो रिक्षाचालक व फुटपाथ दुकानदारांनी या उपक्रमांमध्ये भाग घेत मनपा (Municipal Corporation) प्रशासनाकडे स्वच्छ व मुबलक स्वच्छतागृहांची मागणी केली.
स्वच्छतागृहांच्या सध्या स्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातील वास्तव मनपा प्रशासनाला कळविले होते. वर्ष लोटले तरी महानगरपालिकेने दखल न घेतल्याने अखेर काल आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात (Agitation) ॲड. स्मिता सिंघलकर यांच्यासह योगिता शेंडे, जयश्री गाडगे, डॉ.. प्रियंका राठोड, रेणुका लांडे, पूजा जांगडे, मीना कुंभारे, अमृता अदावडे, अपूर्वा पित्तलवार, शिप्रा विंचूरकर, आरती नान्हे, प्रियंका कारेमोरे, वैष्णवी गिरी, मनीषा राजवाडे, रजत पडोळे, वैभव शिंदे पाटील, अभिजित झा, अभिजित सिंह चंदेल, अमित बांदूरकर, गौरव ठाकरे, प्रतीक बैरागी, शिवम उमरेडकर, प्रज्वल गोड्डे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.