A Statue of Chhatrapati Shivaji Maharaj News : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने महाराजबाग जवळील विद्यापीठाच्या परिसरात सिहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात येणार आहे. १८ जूनला या पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे. सकाळी १० वाजता सर्व नेत्यांच्या आणि स्मारक समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले जाणार आहे. (Bhoomipujan will be performed in the presence of the chief officials)
भूमिपूजनानंतर मुख्य कार्यक्रम देशपांडे सभागृहात होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी पर्यावरणमंत्री आणि ठाकरे सेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे या कार्यक्रमासाठी पुढील आठवड्यात नागपूरमध्ये एका मंचावर येत आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमाला आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण अद्याप त्यांच्याकडून होकार आला नसल्याची माहिती आहे.
उपरोक्त सर्व नेते एकत्र आल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. राज ठाकरे वगळता सर्व नेत्यांनी कार्यक्रमाला येण्याची संमती दिली आहे. आदित्य ठाकरे असल्याने राज ठाकरे होकार देणार की नाही, याची शाश्वती आयोजकांना नाही. शिंदे सेना-भाजपच्यावतीने सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यभर मोठमोठे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
विरोधकांच्यावतीने राज्यभिषेकाला साडेतीनशे वर्षे होण्यास एक वर्षे शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आगामी महापालिका आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी एक वर्षापूर्वीच राज्याभिषेक साजरा करीत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांचा आरोप आहे. मात्र यानंतरही अजित पवार (Ajit Pawar) या सोहळ्याला फडणवीस असतानाही उपस्थित राहणार आहेत.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या शहरात नागपुरात (Nagpur) हा सोहळा होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे असणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरकरांना राजकीय जुगलबंदी अनुभवायला मिळणार, हे निश्चित.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.