Nitin Gadkari News : नागपुरातील साडी जगभरात प्रसिद्ध व्हावी, नितीन गडकरींची इच्छा !

Nagpur : जागेपणी स्वप्न बघून ते पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
Nitin Gadkari, Pravin Datke and Others.
Nitin Gadkari, Pravin Datke and Others.Sarkarnama

Nitin Gadkari in Press Conference at Nagpur : नितीन गडकरी म्हणजे भन्नाट कल्पना राबवणारे व्यक्तिमत्व. जागेपणी स्वप्न बघून ते पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्याचे विविध नमुने त्यांनी आजवर नागपूरकर आणि देशवासीयांना दिले आहेत. आता नागपुरात तयार झालेल्या साड्या जगभर पोहोचाव्या, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. (Sarees made in Nagpur should reach all over the world)

एकेकाळी नागपुरातील हातमागावरील साड्या, पातळ प्रसिद्ध होते. आता पुन्हा बांगलादेश परिसरात हा हातमाग एका कार्यकर्त्यांचा माध्यमातून सुरू करण्यात आला. यातून आकर्षक साड्या तयार होत आहे. येथील साडी जगभरात जावी, अशी इच्छा असल्याचे गडकरींनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

देशभर धावतील इलेक्ट्रिक बस..

गेल्या नऊ वर्षात केंद्रातील भाजप सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आज (ता. ४) गडकरींनी पत्रक्र परिषद घेतली. योजनांच्या माध्यमातून गरिबांच्या कल्याणावर भर दिला. मोठ्या प्रमाणात विकास कामातून शासकीय, खाजगी क्षेत्रात रोजगार निर्माण केला. पायाभूत सुविधांसोबतच पर्यावरण रक्षणावर भर देण्यात असून ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती होत आहे. येत्या पाच-सात वर्षांत देशात सर्वत्र इलेक्ट्रिक बस धावताना दिसतील. डबल डेकर इलेक्ट्रिक बसही सुरू करण्यात येणार असल्याचे गडकरींनी सांगितले.

पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार नाना श्यामकुळे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, अर्चना डेहनकर, नंदा जिचकार, माया इवनाते यांच्यासह माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Nitin Gadkari, Pravin Datke and Others.
Nitin Gadkari News : नितीन गडकरी कसा हाताळणार मोदींच्या विरोधातील जनमानसातला असंतोष?

नाग नदीबाबत ८ दिवसांत दिल्लीत बैठक..

नागपुरातील (Nagpur) नाग नदीच्या पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण प्रकल्प २४०० कोटींचा असून याबाबत येत्या आठ दिवसांत दिल्लीत (Delhi) बैठक होणार आहे. नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे यांच्या नेतृत्त्वात एक समिती गठीत करण्यात येईल. त्यांच्या नेतृत्त्वात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असे गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.

मदर डेअरीचा विस्तार..

मदर डेअरीचा विस्तार करण्यात येत आहे. यासाठी दहा हेक्टर जागा देण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत मदर डेअरी तीन लाख लीटर दुधापासून विविध उत्पादने तयार करते. विस्तारानंतर ३० लाख लीटर दुधापासून उत्पादने तयार होणार असून यातून मोठा रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Nitin Gadkari, Pravin Datke and Others.
Nitin Gadkari Birthday : कामातून देशभर छाप पाडणाऱ्या गडकरींचा 'असा' आहे राजकीय प्रवास

मिहानमध्ये ६८ हजार रोजगार..

मिहानमध्ये गेल्या नऊ वर्षांत ६८ हजार नागरिकांना रोजगार मिळाला. दहा वर्षे पूर्ण होईस्तोवर १ लाखावर ही संख्या जाईल. देशात रस्ते निर्मिती ६० टक्क्यांनी वाढली. त्यानुसार यातूनही मोठा रोजगार निर्माण झाला. मॅगनिज, कोळसा खाणीचे उत्पादन वाढले. यातून रोजगारही वाढला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com