Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar BJP rumor : भाजपमध्ये केव्हा जाणार? विजय वडेट्टीवार म्हणाले एकवेळा जेलमध्ये जाईल...

Vijay Wadettiwar reacts to question of joining BJP Nagpur political update : भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर नागपूरमधील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना अफवा असल्याचे म्हटलं.

Rajesh Charpe

Vijay Wadettiwar latest statement : रोज एक नवा नेता भाजपमध्ये जात आहे. महायुतीची सत्ता पुन्हा आल्यानंतर जाणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे.

यात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याही नावाची अधूनमधून चर्चा रंगत असते. यावर वडेट्टीवार यांनी मोठा खुलासा केला. ते म्हणाले मी एकदाचा जेलमध्ये जाईल, परंतु भाजपात जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.

एक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या फक्त अफवा आहेत. त्या कोणी पसरवीत आहे सर्वांनाच माहीत आहे. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले. तेव्हा त्यांच्यासोबत जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांमध्ये वडेट्टीवार यांचेही नाव चर्चेत होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वडेट्टीवार ओबीसी खात्याचे मंत्री होते. अडीच वर्षाचे सरकार कोसळल्यानंतर वडेट्टीवारांना विरोधीपक्षनेतेपद दिले जाईल अशी आशा होती.

महायुतीची (Mahayuti) पुन्हा राज्यात सत्ता आल्यानंतर काँग्रेसने वडेट्टीवारांना काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते केले. त्यानंतर त्यांच्या जाण्याच्या चर्चा थांबल्या. पुरेसे संख्याबळ नसल्याने सध्या विधानसभा आणइ विधान परिषदेत विरोधी पक्षनेताच नियुक्त करण्यात आलेला नाही. विधानसभेत विरोधी पक्षनेता नसला तरी वडेट्टीवार ती भूमिका चोखपणे बजावत असल्याचे दिसून येते.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला त्यांनीच पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीची भूमिका मांडली. एक आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते नेहमीच भाजपवर तुटून पडतात. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तोफ डागली होती.

लोकसभेच्या विजयाचे श्रेय घेणाऱ्यांनी विधान सभेच्या निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घ्यावी असे त्यांनी जाहीरपणे विधान केले होते. त्यावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला होता. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आल्यानंतर वडेट्टीवार यांचेच नाव आघाडीवर होते. दोन दिवसांपूर्वी वडेट्टीवार यांनी विदर्भावर अन्याय होत असल्याचे सांगून श्रेष्ठींकडे वेगळ्या विदर्भाचा अजेंडा काँग्रेसने घ्यावा असा प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT