BJP Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी पक्ष बदलला, पण धोरण कायम! जिल्ह्यावरील पकड कायम राखण्यासाठी कुबड्या झुगारणार?

BJP Ashok Chavan to Contest Nanded Municipal and ZP Elections Independently Maharashtra Politics : आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण राबवणार असल्याची चर्चा नांदेडच्या राजकारणात सुरू आहे.
BJP Ashok Chavan
BJP Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded political updates : अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल होऊन आता दीड वर्ष उलटून गेले आहे. सुरवातील 'आस्थे कदम' ची भूमिका स्वीकारून वाटचाल करणाऱ्या चव्हाणांनी आता आपले जुने धोरण कायम ठेवत जिल्ह्यावर आपलीच पकड कशी राहील? या दृष्टीने डाव टाकणे सुरू केले आहे.

याचा प्रयोग त्यांनी नगरपालिका निवडणुकीत युतीच्या कुबड्या नाकारून केला आहे. हेच धोरण आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण राबवणार असल्याची चर्चा नांदेडच्या राजकारणात सुरू आहे.

राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. घरातून राजकारणाचे बाळकडू दिंवगत नेते शंकरराव चव्हाण यांच्याकडून मिळाल्याने अशोक चव्हाण यांनी परंपरागत काँग्रेस पक्ष बदलला असला तरी राजकारण करण्याची पद्धत आणि धोरण त्यांनी भाजपमध्ये गेल्यानंतरही कायम ठेवले आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व राखलेल्या चव्हाण यांना सत्तेत वाटेकरी नको आहे. राज्याच्या सत्तेत महायुती असली तरी स्थानिक पातळीवर युतीच्या कुबड्या नको, अशीच त्यांची भूमिका दिसते.

पक्षांतरानंतर लोकसभा निवडणुकीत (Election) भाजपच्या वाट्याला पराभव आला. त्याचे खापर चव्हाण यांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न झाला, पण मराठवाड्यासह राज्यातच पक्षाचे पानीपत झाल्यामुळे चव्हाण यातून सुटले. पुढे विधानसभेत महायुतीने राज्यात कमबॅक केले आणि नांदेडमध्ये सगळ्याच जागा महायुतीने जिंकल्या. पण याचे श्रेय लाडकी बहीण योजनेला गेले, त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाचा कस तिथेही फारसा लागला नाही. नगरपालिका, नगरपंचायती आणि त्यानंतर येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदेत चव्हाण यांना त्यांचा करिश्मा दाखवावा लागणार आहे.

BJP Ashok Chavan
Prashant Bamb controversy : शिक्षकांना डिवचणाऱ्या आमदार बंबांवर भाजपचा पदाधिकारी भडकला; ...तर काळ फसणार!

अशोक चव्हाण यांनी त्याची सुरवात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीपासून सुरू केली आहे. त्याचा निकाल 21 डिसेंबरला लागेल. पण त्याची वाट न पाहता चव्हाण यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीत मित्र पक्षांनीच टारगेट केल्यामुळे त्यांना सोबत घेऊन लढणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे होईल हे चाणाक्ष अशोक चव्हाणांनी ओळखले आहे. त्यामुळे युतीच्या कुबड्या नकोच, अशी भूमिका घेत त्यांनी वाटचाल सुरू केली आहे.

BJP Ashok Chavan
Bhaskar Jadhav : 'ऑपरेशन टायगर' अ‍ॅक्टिव्ह! भास्कर जाधवांनी घेतली एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याची भेट; प्रताप सरनाईकांनी काय घडलं ते सांगितलं

शिवसेना-राष्ट्रवादीच खरे शत्रू?

अशोक चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीतील दोन घटक पक्षांचेच आव्हान असणार आहे. युती केली तरी आणि स्वबळावर लढले तरी या दोन पक्षांविरोधातच चव्हाण पर्यायाने भाजपला लढावे लागेल? असे चित्र आहे. यावर स्वबळाचा मार्ग निवडत अशोक चव्हाण जिल्ह्यातील सगळी सुत्रं आपल्या हाती ठेवू पाहत आहेत. याची कुणकूण शिंदेंच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीलाही आहेच.

निवडणुकीत किती यश मिळते?

शिवसेनेचे उत्तर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी, अशोक चव्हाण यांचे राजकारण जवळून अनुभवलेले आहे. ते कुठल्याच परिस्थितीत महापालिकेला युती करणार नाहीत? याचा अंदाज आल्याने कल्याणकर यांनीही आपल्या मतदारसंघात येणाऱ्या प्रभांगामध्ये स्वबळावर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. नगरपालिका निवडणुकीत किती यश मिळते? यावर राष्ट्रवादी काँग्रेस आपले पुढचे पत्ते खुले करेल, अशी चर्चा आहे. तुर्तास तरी अशोक चव्हाण यांना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत युतीच्या कुबड्या नकोत, असेच दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com